Karad APMC News : सभापतीपदी विजयकुमार कदम; संभाजी चव्हाण उपसभापती

Congress V/s NCP, BJP: शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणुक पहिल्यांदाच चुरशीने झाली. या निवडणुकीत काँग्रेस विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असा सामना झाला.
Karad APMC Vijaykumar Kadam, Sambhaji Chavan
Karad APMC Vijaykumar Kadam, Sambhaji Chavansarkarnama

-हेमंत पवार

Karad Bazar Samiti News: कराड बाजार समितीच्या निवडणुकीत लोकनेते विलासकाका पाटील रयत पॅनेलच्या विजयासाठी मेहनत घेतलेले विजयकुमार कदम यांची सभापतीपदी वर्णी लागली असुन उपसभापतीपदी वारुंजी येथील संभाजी चव्हाण यांची निवड झाली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन उपनिबंधक संदीप जाधव यांनी काम पाहिले.

कराड बाजार समितीची निवडणुक पहिल्यांदाच चुरशीने झाली. या निवडणुकीत काँग्रेस विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असा सामना झाला. त्यामुळे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan, माजी सहकारमंत्री आमदार बाळासाहेब पाटील Balasaheb Patil, काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर Udaysinh Undalkar, भाजपचे कार्यकारणी सदस्य अतुल भोसले Atul Bhosale, माजी आमदार आनंदराव पाटील यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणुक बनली होती.

बाजार समितीच्या निवडणुकीतुन पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची पेरणी होणार असल्याने या निवडणुकीत आपल्याच पॅनेलला बहुमत मिळावे यासाठी नेत्यांनी आपली शक्ती पणाला लावली होती. दरम्यान जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत आमदार पाटील यांनी सोसायटी गटातुन अॅड. उंडाळकर यांच्या विरोधात निवडणुक लढवली होती. तेथे अॅड. उंडाळकर यांना पराभवाला समोरे जावे लागले.

त्या पराभवानंतर अॅड. उंडाळकर यांनी कऱ्हाड तालुक्यातील सोसायटी, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत बारकाईने लक्ष घालुन आपल्याच विचाराचे लोक निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. त्याचबरोबर आमदार पाटील व भोसले गटानेही आपल्याच विचारांच्या सोसायट्या, ग्रामपंचायती व्हाव्या यासाठी प्रयत्न केले. मात्र तरीही कऱ्हाड दक्षिणमधील सोसायट्यांची, ग्रामपंचायतींची संख्या जास्त असल्याने त्याचा फायदा अॅड. उंडाळकर गटाला या निवडणुकीत झाला.

Karad APMC Vijaykumar Kadam, Sambhaji Chavan
Rahul Narvekar Returned To Mumbai :…तर अपात्रतेचा निर्णय घेण्यास विलंब होईल; विधानसभा अध्यक्षांनी स्पष्टच सांगितले

बाजार समितीच्या यावेळच्या निवडणुकीत आमदार पाटील यांनी जिल्हा बॅंकेच्यावेळी एकत्र आलेल्या भोसले गटाला बरोबर घेतले. त्यामुळे तालुक्यात काँग्रेस विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप अशी लढत होत असल्याचे चित्र असले तरीही कऱ्हाड उत्तरमधील भाजपच्या मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ यांनी रयत पॅनेलला मदत केली.

तर कऱ्हाड दक्षिणमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अविनाश मोहिते यांनीही कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीतील मदतीची परतफेड करण्यासाठी यावेळी रयत पॅनेलला मदत केली. त्यामुळे आमदार पाटील आणि भाजपचे भोसले यांच्या गटांनी सर्व शक्ती पणाला लावुन सत्तांतरासाठी केलेला प्रयत्न रोखण्यात उंडाळकर- चव्हाण गटाच्या रयत पॅनेलला यश मिळाले.

बाजार समितीच्या सभापतीपदाची निवडणुक आज सकाळी झाली. त्यामध्ये सभापतीपदी विजयकुमार कदम यांना तर उपसभापतीपदी संभाजी चव्हाण यांना संधी देण्यात आली. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com