MLA Balasaheb Patil : रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा; आमदार बाळासाहेब पाटलांची 'ऑन दि स्पॉट व्हिजिट'

Karad Politics: रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा केल्याने आमदार बाळासाहेब पाटलांनी ठेकेदाराला धरले धारेवर
MLA Balasaheb Patil
MLA Balasaheb Patil Sarkarnama
Published on
Updated on

विशाल पाटील :

Karad News: मल्हारपेठ- मायणी- पंढरपूर राज्य महामार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा होत असल्याची तक्रार मिळताच कराड उत्तरच्या आमदारांनी ठेकेदाराला कामात सुधारणा करण्याच्या सूचना केल्या होत्या.

मात्र, तरीदेखील कामात सुधारणा न झाल्यामुळे आज स्वतः आमदार बाळासाहेब पाटील यांनी 'ऑन दि स्पॉट व्हिजिट' करत कामाची पाहणी करत ठेकेदाराला धारेवर धरले. यामुळे आमदारांच्या या कामाची चर्चा मतदार संघात जोरदार होऊ लागली आहे.  

अर्थसंकल्पात निधी 2023 मधून मंजूर झालेल्या मल्हारपेठ - मायणी - पंढरपूर रस्ता राज्यमार्ग 143 साखळी क्र.22/400 रिसवड गावानजीक डांबरीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्याची पाहणी आमदार बाळासाहेब पाटील यांनी रविवारी केली होती. तसेच कामात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पण तरीही कामात सुधारणा झाली नसल्याने आज पुन्हा आमदार बाळासाहेब पाटील यांनी सदर रस्त्याची पाहणी करून सक्त सूचना संबंधितांना केल्या आहेत. मल्हारपेठ-पंढरपूर मार्गावरील रिसवड येथील रस्त्याचे काम मजबूत होण्यासाठी, डांबरीकरण होण्यापूर्वी रस्ता क्रॉपिंग करून, स्वच्छता करून चांगले काम करण्याच्या सूचना अधिकारी व ठेकेदार यांना आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिल्या.

दरम्यान, या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता संदीप मोरे व ठेकेदारांचे अभियंता भाऊसाहेब चव्हाण उपस्थित होते.

(Edited By - Ganesh Thombare)

MLA Balasaheb Patil
Deputy Sarpanch Election : सरपंचांना भाव अन्‌ उपसरपंचांकडे पाठ....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com