जत (जि. सांगली) : कर्नाटक (Karnataka) सरकारने महाराष्ट्राला (Maharashtra) पुन्हा डिवचले आहे. सांगली (Sangli) जिल्ह्याच्या जत (Jat) तालुक्यातील काही दावा केल्यानंतर आता कर्नाटक सरकारने जत तालुक्यातील तिकोंडी तलावात पाणी सोडले आहे. या तलावातून पाणी सोडून आम्हीच जतमधील जनतेला न्याय देऊ शकतो, असे दाखविण्याचा प्रयत्न कर्नाटककडून होत असल्याचे उघड आहे, त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेणार, याकडे जतमधील जनतेचे लक्ष लागले आहे. (Karnataka government released water in the lake in Jat taluka)
कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा भागात ४२ गावांच्या दाव्यावरून वातावरण चांगलेच तापलेले आहे. मात्र, या तापलेल्या वातावरणात कर्नाटकाकडून बुधवारी (ता. ३० नोव्हेंबर) तुबची बबलेश्वर योजनेचे पाणी सोडण्यात आले आहे. महाराष्ट्रातील तिकोंडी तलाव एकाच दिवसात ओहरफ्लो झाला आहे. शिवाय, दाव्याप्रमाणे कर्नाटक नैसर्गिकरित्या या वंचित गावाला न्याय देऊ शकतो, असे भासविण्याचा प्रयत्न होत आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई आणि माजी जलसंपदा मंत्री एम.बी. पाटील यांनी जतच्या ४२ गावांवर दावा करून महाराष्ट्रात एकच खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या वक्तव्यानंतर जत तालुक्यात प्रचंड संताप व्यक्त होतानाच पूर्व भागाला पाण्यापासून वंचित ठेवल्याने राज्य सरकारवरदेखील नाराजी व्यक्त होत आहे.
सांगलीचे जिल्हाधिकारी पाहणी करत असतानाच पाणी सोडले
राज्य सरकार एकीकडे म्हैसाळ विस्तारित योजना पूर्ण करण्यासाठी तातडीने निर्णय घेत आहे. तर याच वेळी कर्नाटकने जतच्या लोकभावनेला हात घालत थेट तुबची योजना सुरू करून जत तालुक्यात नैसर्गिक प्रवाहातून पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी गुरुवारी (ता. १ डिसेंबर) तिकोंडी भागाचा दौरा करत, कर्नाटकातून नैसर्गिक प्रवाहातून पाणी येऊ शकते का, याची देखील पाहणी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.