केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरण : सुवर्णा कोतकर यांना 3.5 वर्षानंतर अटकपूर्व जामीन मंजूर

अहमदनगर महापालिका पोटनिवडणुकीनंतर केडगाव येथे दोन शिवसैनिकांची हत्या झाली होती.
suvarna kotkar
suvarna kotkarSarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर - अहमदनगर महापालिका पोटनिवडणुकीनंतर केडगाव येथे दोन शिवसैनिकांची हत्या झाली होती. या घटनेत भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले ( Shivaji Kardile ) यांची ज्येष्ठ कन्या तथा अहमदनगर महापालिकेतील माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. Kedgaon double murder case: Suvarna Kotkar granted pre-arrest bail after 3.5 years

केडगाव दुहेरी हत्याकांडातील आरोपी असलेल्या सुवर्णा कोतकर यांना जिल्हा सत्र न्यायालयाने आज अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. केडगाव येथे दोन शिवसैनिकांची हत्या करण्यात आली होती या हत्याकांडात सुवर्णा कोतकर यांचे नाव पोलिसांच्या तपासात पुढे आले होते. या घटनेनंतर सुवर्णा कोतकर या फरार होत्या.

suvarna kotkar
केडगाव दुहेरी हत्याकांड ! सुवर्णा कोतकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

आज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जिल्हा न्यायाधीशांनी सुवर्णा कोतकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात ॲड.महेश तवले, ॲड.संजय दुशिंग, ॲड.विवेक म्हस्के यांनी कोतकर यांची न्यायालयात बाजू मांडली.

suvarna kotkar
सुवर्णा कोतकर यांना अटक करा; त्याशिवाय उपोषण सोडणार नाही! 

काय घडले होतं

अहमदनगर महापालिका पोटनिवडणुकीनंतर केडगावमध्ये 7 एप्रिल 2018ला शिवसेनेचे पदाधिकारी वसंत ठुबे व संजय कोतकर यांची हत्या झाली होती. या प्रकरणातील आरोपींकडून सुवर्णा कोतकर यांच्या बद्दल माहिती तपास करणाऱ्या सीआयडीच्या पथकाला मिळाली होती. त्यामुळे सीआयडीने सुवर्णा कोतकर यांचे नाव या गुन्ह्यात नोंदविले. तेव्हा पासून सुवर्णा कोतकर या फरारी होत्या.

या पूर्वीही त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र तो अर्ज फेटाळण्यात आला होता. आरोपी कोतकरने 2 जानेवारीला पुन्हा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता.

suvarna kotkar
केडगाव दुहेरी हत्याकांड तपासाचा  केंद्रबिंदू ठरतोय नगरसेवक कोतकर 

या अर्जावर सीआयडी आणि सरकारी वकिलांनी म्हणणे मांडले असता मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी झाली होती. दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सुवर्णा कोतकरला काही अटींवर अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.

महाराष्ट्र सोडायचा असल्यास परवानगी घ्यावी, पासपोर्ट जमा करावा, या अटींवर न्यायालयाने एक लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. आरोपी सुवर्णा कोतकरच्यावतीने न्यायालयात अॅड. विवेक म्हसे आणि अॅड. महेश तवले यांनी बाजू मांडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com