खंडाळा कारखाना निकाल : मकरंद आबांच्या माथी विजयासह कर्जाचा गुलाल

खंडाळा कारखाना हा किसनवीर कारखान्याच्या सोबत भागीदारी तत्वावर आहे. या कारखान्यावर मदन भोसले यांची सत्ता आहे, म्हणून भागीदारी करार मोडणे व कर्जाचा डोंगर पार करणे अशा अनेक कसरतीतुन हा कारखाना चालवला लागणार आहे.
MLA Makrand Patil
MLA Makrand PatilAspak Patel

खंडाळा : खंडाळा कारखान्यावर आमदार मकरंद पाटील व ज्ञानदीपचे व्ही.जी.पवार यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास, परिवर्तन पॅनेलने आपले निर्विवाद वर्चस्व सिध्द केले. तर संस्थापक पॅनेलप्रमुख व कारखाना उभा करणारे ज्येष्ठ नेते शंकरराव गाढवे यांच्या गटाला पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत दारूण पराभव स्विकारावा लागला. या निकालामुळे खंडाळा तालुक्याच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळाली असुन राष्ट्रवादीचा वारु अधिक भक्कमपणे पुढे सरकत असल्याचे चित्र आहे.

यापुर्वी तालुक्याचा स्वाभिमान व अस्मिता याविषयावर तालुक्यातील दिग्गज मंडळी कधी अहिरे तर कधी खंडाळा येथे बैठका घेण्यात आल्या होत्या. यावेळी खंडाळा तालुका म्हणून सत्ताधिकारी विरोधात जाण्याची तयारी केल्याने तालुक्यातील काही दिगग्जांनी मोट बांधायचा प्रयत्न केला. मात्र, साडेचार वर्षात यास अपयश आल्याने कारखाना निवडणुकीत सर्व दिग्गज मागील सर्व घडामोडीला बाजुला सारुन आमदार मकरंद पाटील यांच्या मागे उभी राहिली. यामध्ये जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील व माजी सभापती रमेश धायगुडे यांनी आमदार गटाकडे धाव घेतली.

MLA Makrand Patil
मकरंद पाटलांचा करिष्मा; खंडाळा कारखान्यावर निर्विवाद वर्चस्व

याविषयावर विजयी सभेत बोलताना भरगुडे-पाटील यांनी अनेक वर्षानंतर गुलालाची आमची गाठभेट झाल्याचे स्पष्ट केले. तर, माजी सभापती रमेश धायगुडे यांनी तर चक्क आमदारांना खांद्यावर घेऊन विजय साजरा केला. यामुळे येथील राजकारण हे राष्ट्रवादीला भक्कम करणारे ठरले. आणि कारखान्याच्या निमित्ताने काँग्रेस ,शिवसेना यातील काही जणांनी आमदार तर काही नेत्यांनी शंकरराव गाढवे गटाला पाठिंबा दिला. यामुळे या पक्षाची पक्षातंर्गत कुरबुर पाहयला मिळाली. तालुका काँग्रेसचे अध्यक्ष एस.वाय पवार व जिल्हा काँग्रेसचे चंद्रकांत ढमाळ यांची हकालपट्टी करण्याची मागणी ही झाली. आम्ही महाआघाडी बरोबर असल्याचे स्पष्ट करुन, आम्ही घेतलेला निर्णय योग्य असल्याचे सिध्द करुन दाखवले.

MLA Makrand Patil
खंडाळा कारखाना बारामतीच्या घशात घालण्याचा विरोधकांचा अपप्रचार....

या कारखान्याच्या निवडणुकीत संस्थापक पॅनेलने आम्ही 88 वर्षाच्या योध्दासोबत अशी कारखान्याचे संस्थापक पॅनेलचे प्रमुख शंकरराव गाढवे यांच्या विषयी अस्मिता मिळविण्यासाठी केलेला प्रयत्न ही हवेत विरला. यामुळे गाढवे गटाला आत्मचिंतन करायची वेळ आली. तर विरोधी पॅनेलने गाढवे सर हे वडीलधारी असल्याचे व आदर करत असल्याचे स्पष्ट करुन, शंकरराव गाढवे यांच्या पराभवाबद्दल ही खाजगीत आत्मियता दाखविली. आगामी येणाऱ्या खंडाळा नगरपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारातील निवडणुकांत अस्तित्व राखण्यासाठी श्री. गाढवे गटाला कंबर कसावी लागणार आहे.

MLA Makrand Patil
सहकारातील चुकीच्या प्रवृत्तींवर कारवाई करा : अजित पवार

या निवडणुकीच्या पराभवानंतर शंकरराव गाढवे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी यापुढे काम करणार असल्याचे स्पष्ट केले. यावरुन श्री. गाढवे गट दारुण पराभवानंतर पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत दिले. मात्र, यांना आमदार गटाला शह देण्यासाठी शर्थीने खिंड लढवावी लागणार आहे. हे या निकालाने दाखवून दिले आहे. खंडाळा कारखाना हा किसनवीर कारखान्याच्या सोबत भागीदारी तत्वावर आहे. या कारखान्यावर मदन भोसले यांची सत्ता आहे, म्हणून भागीदारी करार मोडणे व कर्जाचा डोंगर पार करणे अशा अनेक कसरतीतुन हा कारखाना चालवला लागणार आहे.

MLA Makrand Patil
तोडणी, वाहतूक खर्चात बचत करून शेतकऱ्यांना जादा ऊस दर द्यावा : बाळासाहेब पाटील

विजयी सभेत मकरंद पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता, त्यावेळी श्री. पाटील यांनी हा कारखाना मोठ्या क्षमतेने चालवू अशी हमी या मंत्रीमहोदयांनी दिली आहे. तर व्ही.जी.पवार यांनी कारखान्याची प्रगती कशी केली जाईल, याबाबत विजयी सभेत हमी दिली. यामुळे येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आशेचे किरण निर्माण झाले आहे. यामुळे सत्ताधिकारी यांची मोठी जबाबदारी ही वाढली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com