Satish Bhosale : 'खोक्या'ला पकडण्यासाठी पोलिसांची फिल्डिंग; वाल्मिक कराडप्रमाणेच पोलिसांना शरण येणार

khokya Will Surrender:सरपंच संतोष देशमुख हत्येचा मास्टरमाईंट असल्याचा आरोप असलेल्या वाल्मिक कराड याच्याप्रमाणे खोक्याही पोलिसांनी शरण येईल, अशी शक्यता आहे.
Satish Bhosale-Suresh Dhas
Satish Bhosale-Suresh DhasSarkarnama
Published on
Updated on

भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कट्टर समर्थक 'खोक्या' उर्फे सतीश भोसले हा पोलिसांना शरण येणार असल्याची माहिती आहे. गेल्या सहा दिवसापासून तो फरार आहे. 'खोक्या'वर मारहाणीसह दोन गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याचा विशेष पोलिसांकडून शोध सुरु आहे. त्यांची आलिशान गाडी पोलिसांनी जप्त केली आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्येचा मास्टरमाईंट असल्याचा आरोप असलेल्या वाल्मिक कराड याच्याप्रमाणे खोक्याही पोलिसांनी शरण येईल, अशी शक्यता आहे. साम टीव्हीने याबाबतचे वृत्त दिले आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार असलेला वाल्मीक कराड हा पुण्यात सीआयडी पोलिसांना शरण आला होता. त्याप्रमाणे खोक्याही पोलिसांना शरण येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. खोक्या भोसले हा शरण येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

Satish Bhosale-Suresh Dhas
ED Raid on Chaitanya Baghel: माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाच्या घरी EDचा छापा; 5 हजार कोटीचा गैरव्यवहार

बीड पोलीस त्याला अटक करण्यासाठी सज्ज झाले आहे. शिरूर तालुक्यातील ढाकणे कुटुंबीयांवर हल्ल्यानंतर सतीश भोसलेविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खोक्याला पकडण्यासाठी पोलिस त्याचा मागावर आहेत. पण तो आपले लोकेशन बदलत असल्याने तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही, पोलिसांनी त्याने पुण्यात वापरलेली फोर्ड कंपनीची इंडीवर गाडी शिरूर कासार तालुक्यातील रायमोहा परिसरातून जप्त केली आहे. ही गाडी शिरूर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com