Kolhapur News: कोल्हापुरात वीस गावं बंद; हद्दवाढीचा मुद्दा पेटणार

Kolhapur Boundary Expansion Protest 20 Villages Bandh: सुरुवातीला कोल्हापूर शहराच्या हद्द वाढीला विरोध करणाऱ्या आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक यांनी जनतेला विश्‍वासात घेतल्याशिवाय कोणत्याही निर्णय घेऊ नका, असे आवाहन सरपंच मधुकर चव्हाण यांनी केले आहे.
Kolhapur
KolhapurSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: कोल्हापूर महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून जवळपास 60 ते 65 वर्ष कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालेली नाही. या संदर्भात कोल्हापूर हद्दवाढ शहर कृती समितीकडून विविध टप्प्यांवर आंदोलन सुरू आहे. कोल्हापूर शहर हद्दवाढ विरोधी कृती समितीकडून शहराच्या हद्द वाढीला विरोध आहे.

त्यातून मध्य मार्ग काढण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली आज कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार आणि खासदारांची बैठक होणार आहे. शिवाय बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत. मात्र या बैठकीचा धसका घेत शहराला लागून असणारी वीस गावाने घेतला आहे. त्यांनी गाव बंद आंदोलन केले आहे.

दरम्यान ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेत कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला विरोध केला आहे. ग्रामीण भागात तीव्र विरोध होत असून वीस गावांनी आज बंद पुकारला आहे. कोल्हापूर शहराची हद्द वाढ झाल्यास आगामी जिल्हा परिषद महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा या ग्रामस्थांनी दिला आहे.

विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय घेऊ नका

दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृह येथे कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसंदर्भात बैठक झाली. यावेळी महायुतीच्या सर्व आमदार, आजी-माजी खासदार उपस्थित होते. हद्दवाढीसंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याचेही ची समोर आली आहे. सुरुवातीला कोल्हापूर शहराच्या हद्द वाढीला विरोध करणाऱ्या आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक यांनी जनतेला विश्‍वासात घेतल्याशिवाय कोणत्याही निर्णय घेऊ नका, असे आवाहन सरपंच मधुकर चव्हाण यांनी केले आहे.

Kolhapur
Sharad Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? चर्चेचे शरद पवारांनी केले एका घावात दोन तुकडे

निवडणूक विभागाने महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या प्रभाग रचनेबाबत शासनास सुचित केले आहे, असे असताना हद्दवाढ करणे हे कायदेशीर व व्यावहारिदृष्ट्या चुकीचे असल्याचे सांगत आजूबाजूच्या 20 गावातील ग्रामस्थांनी आज आपली गाव बंद ठेवत सदर बैठकीचा निषेध केला आहे.

आम्हाला हद्दवाढ नको. आमच्या भावनांचा विचार राज्य सरकारने करावा. हद्दवाढीबाबत आदेश काढला. तर जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांवर बहिष्कार घालून आमची ताकद दाखवू,’ असा इशारा गडमुडशिंगीचे माजी सरपंच तानाजी पाटील यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com