बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीला मोठा धक्का : जिल्हाध्यक्ष करणार शिंदे गटात प्रवेश

ए. वाय. पाटील यांच्या निर्णयामुळे कोल्हापूर राधानगरी तालुक्यात राष्ट्रवादीला खिंडार पडणार आहे. यापूर्वी लेमनराव निकम यांनी पक्ष सोडला आहे.
NCP's A. Y. Patil
NCP's A. Y. PatilSarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर : राज्यातील सत्ता जाताच राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) गळती लागण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादीचे कोल्हापूर (Kolhapur) जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील (A. Y. Patil) यांच्या नाराजीची दखल न घेतल्याने त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गोटात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. ए. वाय. पाटील यांनी दोन वेळा मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली आहे. (Kolhapur District President of NCP A. Y. Patil will join Eknath Shinde group)

ए. वाय. पाटील यांच्या निर्णयामुळे कोल्हापूर राधानगरी तालुक्यात राष्ट्रवादीला खिंडार पडणार आहे. यापूर्वी लेमनराव निकम यांनी पक्ष सोडला आहे. त्यामुळे आता के. पी. पाटील हेच राधानगरी राष्ट्रवादी प्रमुख चेहरा असणार आहेत. राधानगरीचे विद्यमान आमदार हे प्रकाश आबीटकर आहेत. तेही शिंदे गटासोबत आहेत. मात्र, आमदार आबीटकर आणि ए. वाय. पाटील यांनी राधानगरी तालुक्यात एकत्रित काम करावे, असं दुसऱ्या भेटीत ठरल्याचे सांगितले जात आहे. दुसऱ्या भेटीसाठी खासदार संजय मंडलिक आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पुढाकार घेतल्याचे सांगितले जात आहे.

NCP's A. Y. Patil
मोठी बातमी : जयदत्त क्षीरसागर यांची शिवसेनेतून हकालपट्टी

या बैठकीतील सूत्रानुसार ए. वाय. पाटील आणि प्रकाश आबीटकर यांनी एकत्रित करावे. ए. वाय यांचा राज्यस्तरावर योग्य तो मान सन्मान करण्याचे ठरले आहे. तसेच, बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत के. पी. पाटील यांच्या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांची मोट बांधून त्याचे नेतृत्व ए. वाय. पाटील यांनी करावे, असे सूचविण्यात आले आहे.

NCP's A. Y. Patil
भरत गोगावलेंना पराभूत करण्याची रणनीती ठरली; कट्टर विरोधक जगतापांना ठाकरेंकडून पाठबळ!

दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, तसेच बिद्री, भोगावती या साखर कारखान्यांच्या निवडणुकीतील समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. आगामी काळात गोकुळ दूध संघ आणि कोल्हापूर जिल्हा सहकारी बॅंकेच्या राजकारणात ए. वाय. पाटील यांची भूमिका वेगळी राहणार असल्याचे पुढे आले आहे.

ए. वाय. पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून झोकून देऊन काम केले आहे. मात्र, पक्षनेतृत्वाकडून सातत्याने अन्याय केल्याची भावना पाटील यांची भावना आहे. अनेक वेळा शब्द देऊन पक्षनेतृत्वाने तो पाळला नाही. तसेच, पक्षात अनेक वर्षे प्रामाणिकपणे केले तरीही उचित असा मानसन्मान पक्षाकडून मिळाला नसल्याची खंत ए. वाय. पाटील यांनी व्यक्त केली, त्यामुळे ए. वा. पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून फारकत घेण्याचा निणय घेतला आहे. त्यांनीही दुर्लक्ष केल्यानंतर त्यांनी पक्षापासून फारकत घेण्याचा निर्णय जवळपास घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com