मी पाटील, पाठीमागून वार करीत नाही! बंटी पाटील अन् आवाडेंच्यात जुंपली

जिल्हा बँकेतील पराभवावरून आमदार प्रकाश आवाडे आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्यात आज जुंपली.
Prakash Awade and Satej Patil
Prakash Awade and Satej Patil Sarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर : जिल्हा बँकेतील पराभवावरून आमदार प्रकाश आवाडे आणि पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्यात आज जुंपली. आवाडे यांनी लक्ष्य करताच सतेज पाटील यांनी जोरदार उत्तर दिले. एकदा शत्रुत्व पत्करल्यानंतर मी मागे-पुढे पाहत नाही, मी 96 कुळी मराठा, पाटील असून, मागून वार करीत नाही, असे पाटील यांनी जाहीरपणे ठणकावून सांगितले.

हातकणंगले तालुक्यातील तारदाळ सेवा संस्थेच्या इमारतीच्या उद्घाटनाला सतेज पाटील (Satej Patil), प्रकाश आवाडे (Prakash Awade), माजी आमदार सुरेश हाळवणकर, जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे आदी उपस्थित होते. या वेळी बोलताना आवाडे यांनी त्यांचा जिल्हा बँकेतील पराभवाचा मुद्दा उकरून काढला. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मदन कारंडे यांना उद्देशून आवाडे म्हणाले की, जिल्हा बँकेत माझा आणि मदनरावांचा सगळ्यांनी कार्यक्रम केला. मी वेळ येईल तेव्हा बघून घेणार आहे.

Prakash Awade and Satej Patil
नितीन गडकरींच्या नागपुरातच पेट्रोल, डिझेलपेक्षा सीएनजी महाग!

दरम्यान, सतेज पाटलांनी शेवटी बोलणार असल्याचे खुणेने सांगितले. यावर आवाडे म्हणाले की, आमचा कार्यक्रम केला तर केला. तुम्ही काही तो झाकून केला नाही. आम्ही त्यावेळी डोळे बंद करून बसलो होते. हा तुमचा नाही तर आमचा दोष आहे. आम्हीच कमी पडलो होतो.

Prakash Awade and Satej Patil
महागाईचा भडका! सीएनजीवर गाडी चालवणंही आता महागलं

आवाडे यांना उत्तर देताना पाटील म्हणाले की, मी एकदा शत्रुत्व पत्करल्यानंतर मागे-पुढे पाहत नाही, हे सगळ्या जिल्ह्याने अनुभवले आहे. मी 96 कुळी मराठा पाटील आहे. जे करायचे ते मी समोरासमोर करतो. मी मागून वार करीत नाही. केंद्रात भाजपचे सरकार असल्याने महाराष्ट्रातही त्यांचेच सरकार येणार असे आवाडेंना वाटले. आता तुम्ही परत कधी याल, हे माहिती नाही. मी कोणालाही वेगळी वागणूक दिलेली नाही. पालकमंत्री मी सर्वांना न्याय देत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com