Satej Patil: सतेज पाटलांचा तिसरा मित्र कोण? यापूर्वी दोन मित्रांचे सोयीचे राजकारण...

Kolhapur Politics: सतेज पाटील यांचा या लोकसभा निवडणुकीत तिसरा मित्र कोण होणार, याची उत्सुकता पश्चिम महाराष्ट्राला आहे.
Satej Patil
Satej PatilSarkarnama

Kolhapur : लोकसभा निवडणुकीचे राजकारण हळूहळू तापले असताना कोल्हापूर जिल्ह्यात माजी पालकमंत्री व आमदार सतेज पाटील लोकसभा निवडणुकीत कोणती भूमिका घेणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

सध्या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद सतेज पाटील यांच्याकडे आहे. मागील दोन लोकसभा निवडणुकीचा संदर्भ पाहिला, तर दोन्ही निवडणुकीत सतेज पाटील यांनी घेतलेली भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. त्यांनी पाठिंबा दिलेले दोन्हीही उमेदवार संसदेत गेले. 2014 च्या निवडणुकीत मोदी लाटेत करिष्मा केला, तर 2019 च्या निवडणुकीत आघाडीच्या विरोधातच भूमिका घेत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला. दोन मित्रांना खासदार केल्यानंतर दोघांनीही आपला राजकीय स्वार्थ बघून वेगवेगळे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे सतेज पाटील यांचा या लोकसभा निवडणुकीत तिसरा मित्र कोण होणार, याची उत्सुकता पश्चिम महाराष्ट्राला आहे.

महानगरपालिका, गोकुळ दूध संघ, जिल्हा बँक, कारखाना, ग्रामपंचायत, विधान परिषद, विधानसभा व लोकसभा निवडणुकीत माजी पालकमंत्री सतेज पाटील आणि त्यांच्या गटाची भूमिका कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच महत्त्वाची ठरलेली आहे. लोकसभा निवडणुकीत सतेज पाटील व त्यांचा गट ज्या उमेदवाराच्या पाठीमागे उभा राहिला, तो उमेदवार विजयी झाला आहे.

Satej Patil
Nagar: धक्कादायक: मतदान केंद्रावरच एकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

2014 आणि 2019 ची लोकसभा त्याची उदाहरणे आहेत. सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यातील राजकीय वैर राज्याला सर्वश्रुत आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र पाटील यांनी आघाडी धर्म पाळून धनंजय महाडिक यांना पाठिंबा दिला. त्यावेळी धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर लोकसभेला सामोरे गेले. त्यावेळी युतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यावेळी हसन मुश्रीफ यांनी मध्यस्थीची भूमिका घेत दुभंगलेल्या मित्रांना एकत्र करून 2014 च्या लोकसभा निवडणुकीचे मैदान मारले होते. सतेज पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरली.

महाडिक यांचा निशाणा, अन् पाटलांचा गेम

चार महिन्यांतच २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून सतेज पाटील यांच्या विरोधात महाडिक यांनी त्यांचे बंधू अमल महाडिक यांना भाजपच्या तिकिटावर उभे केले. त्यावेळी अवघ्या 15 दिवसांत अमल महाडिक निवडून आले. सतेज पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत हे चित्र वेगळे होते. राष्ट्रवादीकडून धनंजय महाडिक तर युतीकडून पुन्हा संजय मंडलिक निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. पाच वर्षांत राजकीय उलथा-पालथीने संपूर्ण राजकारण ढवळून निघाले होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत दगा दिल्यानंतर सतेज पाटील यांनी आपल्या पराभवाचा वचपा लोकसभेच्या निवडणुकीत काढला. आघाडी धर्माच्या विरोधात जाऊन युतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनाच पाठिंबा देत "जे ठरलंय तेच केलंय" असल्याचे सांगितले. त्यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांना पराभव स्वीकारावा लागला, तर मित्र खासदार संजय मंडलिक यांना सतेज पाटील यांनी आपली सर्व रसद पुरवून जिल्ह्याच्या राजकारणात एक वेगळा अध्याय लिहून ठेवला.

दोन मित्रांना सतेज पाटलांची प्रामाणिक मदत

2014 च्या व 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सतेज पाटील यांनी आपल्या दोन मित्रांना प्रामाणिकपणे मदत करून जिल्ह्यात सतेजपर्व सुरू असल्याचे दाखवून दिले. कोल्हापूर दक्षिण विधानसभा, गोकुळ दूध संघ, जिल्हा बँक निवडणुकीत सतेज पाटील यांचा झंझावत कायम राहिला. मात्र, दोन मित्रांना मदत केल्यानंतर सध्या राज्याच्या राजकारणात झालेले बदल पाहता हे दोघेही मित्र लोकसभा निवडणुकीत सतेज पाटील यांच्या विरोधात असणार आहेत.

राज्याचा राजकारणाचा जिल्ह्यावर परिणाम

वर्षभरापूर्वी शिवसेना फुटल्यानंतर शिंदे गट भाजपसोबत युतीत गेला. त्यानंतर कोल्हापूर आणि हातकलंगले लोकसभा खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे युतीत सहभागी झाले. तर चार महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीतील एक गट युतीत सहभागी झाला. जिल्ह्यातील नेते मंत्री हसन मुश्रीफ हे युतीत सहभागी झाले. त्यामुळे काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील हे महाविकास आघाडीची बाजू लढवत असल्याचे चित्र आहे. जर आगामी लोकसभा निवडणूक भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट एकत्र निवडणूक लढवण्यास सतेज पाटील यांचे मोठे आव्हान उभे असणार आहे, तर सतेज पाटील यांचे सारथी म्हणून राहिलेले मंत्री हसन मुश्रीफदेखील युतीसोबत असल्याने येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सतेज पाटील हे काँग्रेसच्या इतर आमदारांच्या पाठबळावर उमेदवार विजयी करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

तिसरा मित्र कोण?

आमदार सतेज पाटील यांनी आपल्या दोन मित्रांना खासदार केले आहे. मात्र, राज्यातील राजकारणात बदल झाल्यानंतर महाविकास आघाडीकडून उमेदवार शोधावा लागणार आहे. शिवाय सतेज पाटील यांचा तिसरा मित्र कोण असणा,र याची ही चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. सध्या महाविकास आघाडीकडून गोकुळचे संचालक चेतन नरके यांनी लोकसभा निवडणूक लढण्यास संमती दाखवली आहे.

Satej Patil
Katewadi Grampanchayat 2023: "अजितदादांच्या काटेवाडीत राष्ट्रवादीकडून एका मताला अडीचशे रुपये..."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com