MNS Rally in Kolhapur : मनसेच्या जिल्हाध्यक्षासह 300 जणांवर गुन्हा दाखल: विनापरवाना रॅली भोवली...

MNS Rally in Kolhapur : या रॅलीला शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर यांनी प्रत्यक्षात आणि लेखी परवानगी काढली होती. रॅली काढू नये, अशा सूचनाही दिल्या होत्या.
MNS News
MNS NewsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात जमावबंदी असतानाही विनापरवाना मोटारसायकल रॅली काढून सार्वजनिक रस्त्यांमध्ये बेकायदेशीर केल्याबदल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नूतन जिल्हाध्यक्ष राजू दिंडोले, शहर अध्यक्ष प्रसाद पाटील, उत्तर विभागातील जिल्हाध्यक्ष नीलेश धुमाळ, दक्षिण विभागातील जिल्हाध्यक्ष राजू पाटील आणि करवीर मतदारसंघाचे अध्यक्ष अमित पाटील यांच्यासह सुमारे ३०० जणांवर गुन्हा दाखल केला. याची नोंद शाहपूरी पोलीस ठाण्यात झाली. MNS Rally in Kolhapur

मनसेच्या जिल्हाध्यक्ष पदासह अन्य पदाधिका्यांची नियुक्ती नुकतीच जाहीर झाली. त्यामध्ये जिल्हाध्यक्षपदी राजू दिंडोले यांची नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी दुपारी ताराराणी चौकातून शहरातील प्रमुख मार्गावरून दुचाकी रॅली काढली.

या रॅलीला शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर यांनी प्रत्यक्षात आणि लेखी परवानगी काढली होती. रॅली काढू नये, अशा सूचनाही दिल्या होत्या. तरीही त्यांच्या सूचनांना धुडकावून दुपारी ही रॅली स्टेशन रोडमार्गे शहरातील प्रमुख मार्गावरून निघाली.

रॅलीत प्रमुख पदाधिकान्यांसह ३०० जणांचा सहभाग होता. त्यामुळे पोलिसांनी जिल्हाध्यक्ष राजू दिंडोले यांच्यासह विनापरवानगी दुचाकी रॅली कादून वाहतुकीला अडथळा केला. पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन केले; तसेच शहरातील वाहतुकीला खोळंबा केल्याबद्ल गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिली.

Edited by: Mangesh Mahale

MNS News
ACB News: महसूलमंत्र्यांच्या संस्थेकडून मागितली लाच! वजनमापे निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com