कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी (१२ एप्रिल) मतदान पार पडल्यानंतर आज या मतांची मोजणी पार पडत आहे. या निवडणुकीत काँग्रेसकडून चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांना उमेदवारी देण्यात आली. तर भाजपकडून सत्यजित कदम (Satyajeet Kadam) यांना रिंगणात उतरवण्यात आलं आहे.
दहव्या फेरीनंतर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना ३९ हजार ५५५ मत मिळाली आहेत. तर भाजपच्या सत्यजित कदम यांना ३१ हजार ५३२ मत मिळाली आहेत. त्यामुळे जयश्री जाधव या ९ हजार मतांनी आघाडीवर आहेत.
याशिवाय महाराष्ट्रातील सर्वात चर्चित चेहरा आणि भीमशक्ती पक्षाच्या अध्यक्ष करुणा धनंजय मुंडे या देखील या निवडणुकीत आपले नशिब आजमावत आहेत. मात्र या निवडणुकीमध्ये त्यांना फारसे यश येताना दिसतं नाही. कारण १० फेऱ्यानंतर करुणा मुंडे यांना केवळ ६१ मत मिळाली आहेत. त्यामुळे त्यांचा पराभव निश्तित मानला जात आहे.
निवडणूक रद्द करण्याची करुणा मुंडे यांची मागणी
दरम्यान या निकालावेळी आज सकाळी करुणा मुंडे मतमोजणी केंद्रवार दाखल झाल्या. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणूक रद्द करण्याची मागणी केली आहे. या निवडणुकीत आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार करत आपण या प्रकरणी न्यायालयात जाणार असल्याचा इशारा करुणा मुंडे यांनी केली आहे. त्या म्हणाल्या १० तारखेलाच इथं आचारसंहिता संपली होती. तरीही काँग्रेस आणि भाजपने मोठ्या वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात आणि प्रचाराच्या बातम्या दिल्या. यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन झाले आहे.
त्याचबरोबर या पक्षांचे लोक इथं पैसे वाटताना पकडले गेले आहेत. याशिवाय इथं काँग्रेस आणि भाजपकडून ४० लाखांहून अधिक खर्चही झाला आहे. यासंदर्भात मी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. याविरोधात आता मी न्यायालयातही धाव घेणार आहे. तसेच या निवडणुकीत माझा आधीच विजय झाला आहे. मला राजकारणात प्रस्थापित होण्यासाठी या निवडणुकीची मदत झाली हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. मला मतं जरी कमी असली तरी मला या निवडणुकीत बरचं काही शिकायला मिळालं आहे. यासाठी मी देवाचे आभार मानते. मी हारुनही जिंकणारी बाजीगर आहे, असेही मुंडे म्हणाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.