कोल्हापूर 'उत्तर' : काँग्रेसच्या जयश्री जाधवांना गुलाल लावण्याचा शिवसैनिकांचा निर्धार

Rajesh Kshirsagar | Shivsena | Kolhapur North Bye poll : राजेश क्षीरसागर यांची तलवार म्यान...
shivsena - congress
shivsena - congressSarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि शिवसेनेचे (Shivsena) माजी आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी तलवार म्यान केली असून दोन दिवस नॉट रिचेबल राहिल्यानंतर आज माध्यमांसमोर येत त्यांनी पक्षाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आदेशानुसार काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र त्यापूर्वी आज कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Kolhapur North ByePoll) आज महाविकास आघाडीचा पहिला संयुक्त मेळावा कोल्हापूरमध्ये पार पडला. यात क्षीरसागर यांनी मागील काही दिवसांपासून घेतलेल्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

या मेळाव्यात बोलताना शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, खासदार संजय मंडलिक आणि माजी शहराध्यक्ष रविकिरण इंगवले हे दोघे इथे उपस्थित नाहीत, मात्र त्या दोघांनीही सांगितले की उद्धव ठाकरे यांनी आपल्याला जी काही जबाबदारी दिली आहे ती आपण पूर्ण ताकदीने पार पाडू. बुधवार, गुरुवार बैठकांच्या फेऱ्या चालू होत्या. यात आम्ही मतदारसंघाचा मागचा ७ निवडणुकांचा इतिहास, शिवसेनेची मत असे सगळे गणित मांडले. आम्ही आमचे सगळे प्रयत्न केले, पण शेवटी उद्धव ठाकरे यांचा निर्णय आमच्यासाठी अंतिम असतो आणि आता तिथून आदेश आलेला आहे, ताईंना निवडून आणा. आता याच आदेशाप्रमाणे शिवसेना जयश्री जाधव यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार आहे. थोडी फार नाराजी असते, चीड असते. पण मातोश्री आमच्यासाठी मंदिर आहे आणि तिथला आदेश आमच्यासाठी अंतिम आदेश असतो.

shivsena - congress
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, निळवंडेच्या गप्पा मारणारे 30 वर्षांपूर्वी कुठे होते...

तर शिवसेनेचे हातकणंगलेचे खासदार धैर्यशिल माने म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आज आम्ही इथे उपस्थित आहे. सर्व ताकदीनिशी जयश्री जाधव यांना निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. काँग्रेसच्या उमेदवार म्हणून नाही, तर महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून उभं राहणार आहात, असा आशावाद माने यांनी दिला. ते पुढे म्हणाले, शिवसेनेची ताकद कोल्हापुरमध्ये मोठी आहे. ज्यावेळी सगळ्या राज्याचे आणि देशाचे वारे एका बाजूला असते तेव्हा कोल्हापूरचे वारे एका बाजूला असते. काँग्रेस एकहाती राज्यात घौडदौड करत होती, तेव्हा कोल्हापूरमध्ये शिवसेनेची भगवी पताका फडकली होती.

आजही शिवसेनेचा हा अधिकाराचा आणि हक्काचा मतदारसंघ आहे, यासाठी आम्ही भांडलो. सर्वांनी सगळे प्रयत्न केले. पण आता निर्णय झालेला आहे. उद्धव ठाकरे यांचा आदेश आहे या जागेसाठी ताकद पणाला लावा आणि निवडून आणा. या आदेशानुसार आता उद्धव ठाकरेंची मान आता कुठेही शरमेने मान खाली जाणार याची काळजी घ्यायची आहे. जयश्री जाधव यांना निवडून आणायचं आहे, असा निर्धार खासदार माने यांनी यावेळी बोलून दाखवला.

shivsena - congress
हे अजितदादांचे काम नाही, ते माझे काम आहे : शरद पवारांची गुगली!

शिवसेनेचे कोल्हापुरचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर म्हणाले, ज्यावेळी आमची चर्चा झाली तेव्हा राजेश क्षीरसागर इथून इच्छुक होते. जे सहाजिक होते. पण आमची बैठक झाली अन् त्यात ठरलं की जो निर्णय उद्धव ठाकरे घेतील तो आपल्याला मान्य करायचा आहे. त्यानुसार उद्धव ठाकरे यांचा निरोप आला, अरुण आपल्याला ही जागा महाविकास आघाडीमार्फत लढवायची असून ती आता काँग्रेसला सोडायची आहे. त्यानुसार आता इथून जयश्री जाधव यांना निवडून आणायचे आहे. याशिवाय राजेश क्षीरसागर यांच्याबद्दल देखील मी सांगतो की, तो हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे, त्यामुळे तो हा आदेश पाळणारच आणि त्याला तो पाळावाच लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com