Mahayuti Politics : महायुतीतून दोन जागा, तरीही विनय कोरे यांनी हातपाय पसरले!

Karvir Assembly Constituency: करवीर विधानसभा मतदारसंघावर जागा वाटपापूर्वी जनसुराज्य शक्तीने दावा केला होता. मात्र जागा वाटपात ही जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला गेली.    
Vinay Kore
Vinay KoreSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : महायुतीत घटक पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाला जिल्ह्यातील दहा पैकी दोन जागा वाट्याला आल्या आहेत. पन्हाळा-शाहूवाडी आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघावर विनय कोरे यांनी जागा मिळवण्यात यश मिळवले आहे. मात्र जागा वाटपाच्या चर्चेपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील चार मतदारसंघांवर जनसुराज्य शक्ती पक्षाने दावा केला होता.

जागा वाटपात दोन अधिकृत मतदारसंघ मिळालेले असतानाही बंडखोरीच्या रूपाने जनसुराज्य शक्ती पक्षाने आणखी दोन मतदारसंघात हातपाय पसरले आहेत. पन्हाळा-शाहूवाडी, हातकणंगले विधानसभा मतदारसंघ पाठोपाठ करवीर आणि चंदगड मध्ये देखील उमेदवार दिले आहेत.

Vinay Kore
Kolhapur Politics: काँग्रेसची बाजी, ठाकरेंच्या शिवसेनेची पीछेहाट, राष्ट्रवादीला बळ; कुणाला किती जागा मिळाल्या?

करवीर विधानसभा मतदारसंघावर जागा वाटपापूर्वी जनसुराज्य शक्तीने दावा केला होता. मात्र जागावाटपात ही जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला गेली. माजी आमदार चंद्रदीप नरके या मतदारसंघातून महायुतीतून उमेदवार आहेत. मात्र जनसुराज्य शक्तीने या मतदारसंघात व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टचे संताजी घोरपडे यांना उमेदवारी देत महायुतीतून बंडखोरी केली आहे.

वास्तविक पाहता ही लढत मैत्रीपूर्ण होणार आहे. मात्र त्यामागे राजकीय खेळी असल्याचे देखील सांगितले जाते. उमेदवारी माघारीसाठी अजून काही अवधी शिल्लक असला तरी घोरपडे हे निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. करवीर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार राहुल पाटील यांना पन्हाळा भागातील मताधिक्य मिळू शकते. मात्र, याठिकाणी जनसुराज्याने उमेदवारी देऊन हे मताधिक्य वळवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. शिवाय महायुतीचे उमेदवार यांना देखील त्याचा फटका बसू शकतो.

Vinay Kore
Man-Khatav Assembly Election : गोरे बंधुंचे मनोमिलन होणार? एका तपानंतर एकत्र येण्याची शक्यता

चंदगड विधानसभा मतदारसंघात ही हीच परिस्थिती आहे. दौलत कारखान्याचे चेअरमन मानसिंग खोराटे यांना जनसुराज्य शक्ती पक्षाची उमेदवारी देण्यात आली आहे. मागील निवडणुकीत मैत्रीपूर्ण लढतीतच युतीचा घात झाला होता. केवळ निसटत्या मतांमुळे त्या ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला होता.

अशी परिस्थिती असताना महायुतीमध्ये असलेले राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने डॉ. नंदाताई बाभुळकर रिंगणात आहेत. मात्र महायुतीमध्ये बंडखोरी करत भाजपचे नेते शिवाजीराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. शिवाय जनसुराज्य शक्ती पक्षाने देखील कोराटे यांना उमेदवारी देऊन बंड केले आहे. मात्र या बंडामुळे महायुतीच्या उमेदवाराला नेमका काय फायदा होणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com