Kolhapur News : विधानसभा निवडणुकीचा निकाल 24 तासांवर येऊन ठेपल्यानंतर ही कार्यकर्त्यांमधील उत्साह कमी झालेला नाही. आपलाच नेता निवडून येणार यासाठी चौका चौकात चर्चा रंगल्या असताना लाखांच्या पैजांचे बोल बाहेर पडू लागले आहेत. विरोधक उमेदवारांच्या कार्यकर्ते गाठून कोल्हापूर दक्षिण राधानगरी कागल विधानसभा मतदारसंघात लाखभरांच्या पैजा आता लागल्या आहेत.
पालकमंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध समरजीत घाटगे, ऋतुराज पाटील विरुद्ध अमल महाडिक, प्रकाश अबिटकर विरुद्ध के पी पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाखांच्या पैजा लागलेल्या दिसत आहेत. त्याचे आव्हान देणारे फलक सोशल मीडियावर सध्या व्हायरल होताना दिसत आहेत.
राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये विधानसभेची निवडणूक अत्यंत अटीतटीची ठरली आहे. दोन शिवसेनेमध्ये ही लढत होत असली तरी कार्यकर्ते मात्र इर्षेला पडले आहेत. इथे पैजा झडल्या आहेत. माजी आमदार के. पी. पाटील यांचे समर्थक असलेल्या राजाराम भाटळे यांनी राधानगरीतून 25 लाख रुपयेची पैज लावून आव्हान दिले आहे. तर याला उत्तर देत अनेकांनी मी 25 लाखाची पैज लावायला तयार आहे असे प्रति आव्हान दिले आहे. यावेळेस जबरदस्त इर्षा आणि आत्मविश्वास दिसत आहेत .
आमदार प्रकाश आबिटकर कोणत्याही परिस्थितीत हॅटट्रिक साधणार हा कार्यकर्त्यांचा दावा आहे. तर के. पी. पाटील हे लय भारी ठरणार हा मुद्दा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून पुढे येत आहे. पैजा लागल्या आहेत. कसबा वाळवे येथील अमेय पाटील आणि पांडुरंग कोकाटे या दोन कार्यकर्त्यांमध्ये पैज लावून 25 हजार रुपयाची पैज लागली आहे. एका मध्यस्थिच्या मार्फत पैसेही जमा केले आहेत.
या मतदारसंघातील बिद्री साखर कारखान्याचे संचालक राजाराम भाटळे यांनी के. पी. पाटील निवडून येणार कोणाच्या हिम्मत असेल तर 25 लाखाची पैज लावा असे आव्हान केले. खरे तर ही इतकी मोठी पैज हेच मोठे आव्हान आहे. ही 25 लाखाची पैज लावण्याचे धाडस एखादा कार्यकर्ता करतो आणि यालाही आमदार आबिटकर यांचे कार्यकर्ते कमी पडलेले नाहीत.
होय आम्ही पैज लावायला तयार आहोत. या' ठिकाण ठरवा आणि मध्यस्थीमार्फत आपण करार करू, असे प्रति आव्हान गारगोटी येथील दिलीप देसाई यांनी दिले आहे . यासह अनेक पैजा लागल्या आहेत. यामुळे येथील निकालाकडे सबंध जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. नेत्यांसाठी कार्यकर्ते किती थराला जाऊ शकतो त्याचे हे उदाहरण म्हणावे लागेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.