Koregaon News : कोरेगाव नगरपंचायत गैरव्यवहार : विरोधी पक्षनेते दानवेंनी दिले चौकशीचे आदेश

Political News : या प्रकरणी उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करण्याच्या सूचना नगरविकास मंत्रालयातील अधिकाऱ्यांना दिल्या.
ambadas danve
ambadas danve Sarakranama
Published on
Updated on

Koregaon Nagar panchayat News : कोरेगाव नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरात झालेल्या व सध्या सुरू असलेल्या काही कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत या कामांची तसेच मुख्याधिकाऱ्यांच्या कारभाराची चौकशी करून कारवाई करावी', या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे यांच्या मागणीवरून विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणी उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करण्याच्या सूचना नगरविकास मंत्रालयातील अधिकाऱ्यांना दिल्या.

कोरेगाव नगरपंचायतीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत त्याविरोधात उबाळे यांनी गेल्या महिन्यात कोरेगाव येथील तहसीलदार कार्यालयासमोर केलेल्या ठिय्या आंदोलनास्थळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भेट दिली होती. या प्रकरणी मुंबई येथे मंत्रालयातील त्यांच्या दालनात बैठक घेऊन दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेण्याचे व योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना संबंधितांना देण्याचे आश्वासन त्यावेळी दिले होते. त्यानुसार बुधवारी मुंबई येथे अंबादास दानवे यांच्या दालनात बैठक झाली.

ambadas danve
Aditya Thackeray News : गावितांचे इगतपुरी ‘बायपास’ ठाकरे पोहचले थेट सिन्नरच्या राजाभाऊंकडे!

या वेळी नगर विकास विभागाचे कक्ष अधिकारी विलास धायजे, विरोधी पक्ष नेत्यांचे खासगी सचिव आनंद रामटेके, कोरेगावचे तहसीलदार डॉ. संगमेश कोडे, मुख्याधिकारी विजया घाडगे, 'महसूल'चे सागर देशमुख, नगरपंचायतीचे अभियंता मदने, स्वतः उबाळे, मुकुंद पवार, नगरसेवक हेमंत बर्गे, प्रीतम बर्गे, गणेश धनवडे, दिनेश सणस आदी उपस्थित होते.

या बैठकीत झालेल्या चर्चेसंदर्भातील तपशीलवार माहिती देताना उबाळे यांनी सांगितले, की या बैठकीला सातारा जिल्ह्यातील व नगर विकास विभागातील अधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी आमच्या बाजूने मी पुराव्यासह कागदपत्रे सादर केली. त्याची पडताळणी करून त्यांनी माझे म्हणणे पूर्णपणे ऐकून घेतले. त्यानंतर त्यांनी कोरेगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांचेही म्हणणे ऐकले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सुमारे दीड ते दोन तास सर्व विषयांवर सविस्तर चर्चा झाल्या. त्यानंतर कोरेगावातील घनकचरा प्रकल्पाबाबत तसेच एकाच वर्षात एकच रस्ता डांबरी व काँक्रीटचा झाल्याबाबत तसेच बॅटरी खरेदीतील घोटाळ्याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल आठ दिवसांत सादर करावा, असे दानवे यांनी ठणकावले आणि या प्रकरणी उच्चस्तरीय समिती नेमून या प्रकरणाशी संबंधित सर्वांची चौकशी करावी, असे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले असल्याचे नमूद करून या प्रकरणी आम्हाला नक्कीच न्याय मिळेल, असा विश्वास उबाळे यांनी व्यक्त केला आहे.

शशिकांत शिंदेंनेही साधला संवाद

'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार' या पक्षाचे खासदार शरद पवार यांनी बैठक बोलावल्यामुळे आमदार शशिकांत शिंदे कोरेगाव नगरपंचायतीसंदर्भातील मुंबईतील बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, आमच्या बैठकीदरम्यान त्यांनी विरोधी पक्षनेते दानवे यांच्याशी संपर्क करून संवाद साधल्याची माहिती उबाळे यांनी दिली.

R

ambadas danve
Ambadas Danve : कपभर चहासाठी दानवेंनी पोलिसांना धरले वेठीला; 'स्टंटबाजी'ने काय साध्य केलं ?

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com