लहू कानडेंचा करण ससाणेंना धक्का : अंजुम शेख गटाशी साधली जवळीक

श्रीरामपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो.
MLA Lahu Kanade
MLA Lahu KanadeSarkarnama
Published on
Updated on

महेश माळवे

श्रीरामपूर ( जि. अहमदनगर ) : श्रीरामपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. श्रीरामपूर काँग्रेसमध्ये सध्या आमदार लहू कानडे व युवा नेते करण ससाणे यांचे गट प्रभावी आहेत. यातच आमदार लहू कानडे यांनी मोठी राजकीय खेळी करण ससाणे यांना मोठा राजकीय धक्का दिला आहे. ( Lahu Kanade hits Karan Sasane: Anjum Sheikh gets close to group )

देशभरात कॉंग्रेस पक्ष अडचणीत आलेला असतानाच राज्यात मात्र डिजिटल सभासद नोंदणीच्या माध्यमातून जुन्या व नव्या सहकार्‍यांना साद घालत पुन्हा काँग्रेसकडे आणण्यासाठी सर्वच पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसपासून दूर गेलेला माजी उपनगराध्यक्ष अंजुम शेख यांच्या गटाला डिजिटल सदस्यत्व देत आमदार लहू कानडे यांनी त्यांच्या हाती पुन्हा काँग्रेसचा झेंडा दिला आहे. या माध्यमातून कानडे यांनी आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट केली आहे.

MLA Lahu Kanade
लहू कानडे म्हणाले, काँग्रेस देशात असा एकमेव पक्ष की, ज्याची जपवणूक जनता करतेय...

आमदार कानडे आपल्या राजकीय कौशल्यातून पक्षातील आपले वजन बळकट करत आहेत. यापूर्वी काँग्रेस केवळ ससाणे गटापूर्ती मर्यादित होती. विधानसभेच्या निवडणुकीत ससाणे गटाने आमदार कानडे यांच्या प्रचारात प्रमुख भूमिका पार पडली. मात्र, नंतरच्या काळात ससाणे व कानडे गटात कुरबुरी वाढायला लागल्या. यातून उक्कलगाव येथे झालेल्या वादाने चांगलीच ठिणगी पडली. त्यानंतर आमदार कानडे यांनी बाभळेश्वर-नेवासा रस्त्याच्या शुभारंभप्रसंगी मतदारसंघातील सरपंचांचा सत्कार घडवून आणत स्वतंत्र मोर्चेबांधणीला प्राधान्य दिले. आता डिजिटल सभासदत्व नोंदणीच्या माध्यमातून ससाणे गट व काँग्रेसपासून दुरावलेल्या सहकार्‍यांना आपलेसे करत आगामी निवडणुकांसाठी आतापासूनच शड्डू ठोकण्यास प्रारंभ केला आहे. किरकोळ वाद शांतपणे मिटविणारे आमदार कानडे आता आक्रमक भूमिकेत आले आहेत. त्यामुळे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ससाणे व कानडे यांच्या वादात काय भूमिका घेतात हे पहावे लागेल.

MLA Lahu Kanade
मी लोकप्रतिनिधी आहे, तुमचा काॅन्स्टेबल नाही ! आमदार लहू कानडे निरीक्षकांवर संतापले

दरम्यान, ज्येष्ठ नगरसेवक अंजुम शेख यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक राजेश अलघ, रवींद्र गुलाटी, मुख्तार शाह, विजय शेळके, कलीम कुरेशी, रज्जाक पठाण, बदरुद्दीन पिरजादे, किशोर शिंदे व अंजुम शेख यांनी डिजीटल सदस्यत्व स्वीकारले. तसेच डिजीटल सभासद नोंदणी अधिकारी म्हणूनही पक्ष सभासद करण्यास प्रारंभ केला. यावेळी अशोक कानडे, ॲड. समीन बागवान उपस्थित होते.

आमदारांच्या पुर्णवादनगरमधील निवासस्थानी डॉ. नितीन आसने, विश्वनाथ मुठे, दत्ताभाऊ आदिक, निवृत्ती बडाख, अशोक बागुल आदी तालुक्यातील प्रमुख जुन्या काँग्रेस जनांनी काँग्रेस पक्षाचे डिजीटल सदस्यत्व स्वीकारुन आमदार कानडे यांच्यासोबत पक्षकार्य करण्याचे जाहीर केले. याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष इंद्रभान थोरात, तालुकाध्यक्ष अरुण नार्इक, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अंकुश कानडे, सतीश बोर्डे आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com