Laxman Mane : मराठा आरक्षणाबाबत लक्ष्मण मानेंचे मोठे विधान; म्हणाले, 'केंद्राने मर्यादा...'

Maratha Vs OBC : मराठ्यांना ओबीसींप्रमाणे सवलती मिळाल्या पाहिजेत
Laxman Mane
Laxman ManeSarkarnama
Published on
Updated on

Satara Political News : राज्यात मराठा आणि ओबीसी समाज आरक्षणावरून एकमेकांसमोल ठाकल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेत, मंत्री छगन भुजबळ यांच्यातील शाब्दिक चकमक टोकाला गेली आहे. दोघेही एकमेकांवर एकेरी भाषेत टीका करत आहे. परिणामी हा वाद चिघळण्याची शक्यता आहे. यातच लक्ष्मण माने यांनी मराठा आरक्षणावरून मोठे विधान केले आहे.

पंतप्रधानांनी पुढाकार घ्यावा

'ओबीसी समाजाला ज्या सवलती मिळतात, त्या मराठा समाजालाही मिळाल्या पाहिजेत. मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा आहे. केंद्र सरकारने आरक्षणाची मर्यादा उठवून 50 टक्क्यांपुढे न्यावी.यासाठी पंतप्रधानांनी संसदेत विधेयक मांडून मंजूर करून घेतले पाहिजे. जनतेचे सर्वोच्च सभागृह संसदेने पारित केलेला कायदा सर्वोच्च न्यायालय नाकारू शकत नाही,' असे आवाहन लक्ष्मण माने यांनी केले आहे.

Laxman Mane
Asaduddin Owaisi : ओवैसींचा अन्य राज्यांतील जनाधार संपुष्टात येतोय

भुजबळ-जरांगेंना सुनावले

लक्ष्मण माने म्हणाले, 'छगन भुजबळ व जरांगे-पाटील यांचा एकमेकांवर शाब्दिक प्रहार सुरू आहे. भुजबळ हे संविधानात्मक पदावर आहेत. एक तर त्यांनी राजीनामा द्यावा अथवा त्यांनी त्यांची वक्तव्ये करणे थांबवावीत. तसेच मनोज जरांगे-पाटील यांनीही लायकी नसणाऱ्यांची हाताखाली मराठ्यांच्या पोरांना काम करावे लागते, असे वक्तव्य केले आहे. हे वक्तव्य मनुवादी मानसिकतेचे आहे. जरांगेंना वर्णवादी व्यवस्था मान्य आहे काय,' असा प्रश्न उपस्थित करून मानेंनी दोघांचाही समाचार घेतला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संविधानाचे महत्त्व

'वर्णव्यवस्था तुम्हाला शिक्षणाचा अधिकार देत नाही. या वर्णव्यवस्थेने तुम्हाला शेतीशिवाय दुसरे काही करण्याचा अधिकार नसतो. आज तुम्हा-आम्हाला जे स्वातंत्र आहे, ते फक्त संविधानाने दिले आहे, हे लक्षात घ्यावे. ब्राह्मण समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे व बाकीच्या जागा खुल्या कराव्या. देशात दहा टक्के लोकांकडे ९० टक्के संपत्ती अन ९० टक्के लोकांकडे दहा टक्के संपत्ती आहे,' याकडेही मानेंनी लक्ष वेधले.

(Edited by Sunil Dhumal)

Laxman Mane
Vijay Auti Parner : विजय औटींनी उपस्थित केला कळीचा मुद्दा; अतिवृष्टीवरून सरकारची कोंडी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com