एलसीबीची धडाकेबाज कारवाई; तीन दरोड्यांचा पर्दाफाश, नगर जिल्ह्यातील पाच जणांना अटक

एलसीबीचे LCB सहाय्यक पोलिस निरिक्षक API रमेश गर्जे Ramesh Garje यांच्या पथकाने नगर जिल्ह्यातील Nagar District कर्जत Karjat येथे छापे टाकून काल रात्री उशीरा संशयितांना ताब्यात घेतले.
Crime Nagar
Crime Nagarsarkarnama
Published on
Updated on

कऱ्हाड : गेल्या १५ दिवसांपासून सातारा जिल्ह्यात पडलेल्या मसूरसह वडूज व पुसेसावळी येथील सशस्त्र दरोड्यांनी पोलिसांची झोप उडाली होती. या तिन्ही दरोड्यांचा जलदगतीने तपास करून एलसीबीच्या पथकाने हे दरोडे उघडकीस आणले आहेत. या प्रकरणी नगर जिल्ह्यात एकाच वेळी तीन ठिकाणी छापे टाकत दरोडेखोऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. येथून पाचजणांना अटक केली आहे.

सातारा एलसीबीचे सहाय्यक पोलिस निरिक्षक रमेश गर्जे यांच्या पथकाने नगर जिल्ह्यातील कर्जत येथे छापे टाकून काल रात्री उशीरा संशयितांना ताब्यात घेतले. काही दरोडेखोरांना पाठलाग करून ताब्यात घेतले आहे. यामध्ये अविनाश उर्फ कल्या सुभाष बोसले (वय 24), अजय सुभाष भोसले (22) सचिन सुभाष भोसले (20, तिघे रा. माही, जि. नगर), राहूल उर्फ काल्या पदू भोसले (24, रा. वलुज, जि. नगर) होमराज उद्धव काळे (25, रा. आष्टी जि. बीड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

Crime Nagar
सातारा युवक काँग्रेस : जिल्हाध्यक्षपदी अमरजित कांबळे, अमित जाधव कार्याध्यक्ष

याप्रकरणी सहायक पोलिस निरिक्षक रमेश गर्जे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केलेल्या धाडसी कारवाईने मसूरसहीत पुसेसावळी व वडूज येथील तिन्ही दरोड्यांचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी मोबाईलच्या तांत्रिक तपसातून टोळीचा पर्दाफाश केला आहे. अद्याप या टोळीतील तिघांचा शोध पोलिस घेत आहेत. त्यादृष्टीने तपास सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com