

Solapur, 11 July : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार देवेंद्र कोठे यांचे अभिनंदन. कारण त्यांच्यामुळे सोलापुरातील B2 जमिनीचा प्रश्न मार्गी लागला आहे. सोलापूरचे नेते मुख्यमंत्री झाल्यावरही B2 चा प्रश्न सोडवला गेला नव्हता. पण मुख्यमंत्री फडणवीस, महसूलमंत्री बावनकुळे यांनी B2 चा प्रश्न मार्गी लावला आहे. आम्ही जो शब्द दिला, तो प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू, असेही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.
सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. ते म्हणाले, सोलापूरमधील बी२ जमीनधारकांना 1989 च्या रेडी रिकनर दाराप्रमाणे 2.5% शुल्क भरून मालकी हक्क मिळणार आहेत. B2 च्या प्रश्नाबाबत कॅम्प लावून हा विषय मार्गी लावावेत. जो शब्द दिला, तो प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करु.
आयटी पार्कच्या जागेबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मात्र जी जागा ठरली तिथेच IT पार्क होणार आहे. विमानसेवेबाबत व्हिजिबिलीटीची अडचण नाही. विमान कंपनीने स्वतःच्या फायद्यासाठी ते कारण दिले होते, त्यामुळे कंपनीला नोटीस काढण्यात आली आहे. कंपनीने विमानसेवा सुरू करावी, असे आदेश दिले आहेत. सध्याच्या कंपनीने विमानसेवा सुरू केली नाही, तर दुसऱ्या कंपनीला काम देऊ, असा इशाराही गोरेंनी दिला.
ते म्हणाले, सोलापूर शहरातील उड्डाणपुलांचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. जागेचा विषय जिल्हाधिकाऱ्यांनी जवळपास सोडवला आहे. सुमारे 70 टक्के जागा हस्तांतरीत झाली आहे.
अल निनोमुळे अद्याप पाऊस पडला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी पाणी जपून वापरले पाहिजे. शेतीसोबत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे. विजेची अडचण आम्हाला माहिती आहे, मी पण शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्यांना आजपासून 2 ऐवजी 5 तास वीज मिळणार आहे. त्यामुळे भाजपने सोलापूर शहर आणि जिल्ह्याला प्रत्येक शब्द पूर्ण करू, असेही गोरे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.