Sanjay Shinde
Sanjay ShindeSarkarnama

विधान परिषदेला मतदान केल्यानंतर संजयमामा शिंदेंनी केला हा दावा!

खासदार राऊत साहेब हे मोठे नेते आहेत. महाराष्ट्राची अस्मिता आहे. ते स्वाभिमानी नेते आहेत.
Published on

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) ज्या चुका झाल्या आहेत. त्या पुन्हा होणार नाहीत, याची दक्षता विधान परिषद निवडणुकीच्या (Legislative Council election) वेळी घेण्यात आली आहे, त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सहाच्या सहा उमेदवार निवडून येतील, असा दावा महाविकास आघाडीचे समर्थक अपक्ष आमदार संजय शिंदे (Sanjay Shinde) यांनी मतदानानंतर बोलताना केला. (Legislative Council election : Six candidates of Mahavikas Aghadi will win : Sanjay Shinde)

विधान परिषद निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावल्यानंतर आमदार शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना वरील माहिती दिली. ते म्हणाले की, राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून ज्या चुका झाल्या होत्या. त्या चुकांची दुरुस्ती या वेळी झाली आहे. राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार बाजार केल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्या विषयावर बोलताना आमदार संजय शिंदे म्हणाले की, तो विषय आता संपला आहे. खुद्द संजय राऊत यांनी त्याबाबत स्पष्टीकरण दिले होते. तसेच, खासदार राऊत साहेब हे मोठे नेते आहेत. महाराष्ट्राची अस्मिता आहे. ते स्वाभिमानी नेते आहेत. माझ्या संदर्भात त्यांचा झालेला गैरसमज मी त्यांची भेट देऊन दूर केलेला आहे.

Sanjay Shinde
मोठी बातमी : राष्ट्रवादीच्या भगिरथ भालकेंची प्रचार सभा उधळण्याचा प्रयत्न

भाजपच्या चमत्काराच्या दाव्यावर संजय शिंदे म्हणाले की, चमत्कार घडेल, असे मला तरी वाटत नाही. विधान परिषदेच्या निवडणुकीत मी महाविकास आघाडी सरकारच्या बाजूने असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Sanjay Shinde
नाराज दिलीप मोहिते अजितदादांच्या भेटीला; मतदानाबाबत केले सूचक वक्तव्य!

विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे सहाच्या सहा उमेदवार निवडून येतील. महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींकडून रविवारपासून मतदानाबाबत सूचना देण्यात येत आहेत, त्याप्रमाणे मतदान करण्यात येत आहे. मी नाराज नसून मी महाविकास आघाडीच्या बाजूनेच आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com