अखेर २० वर्षानंतर नगरमध्ये पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राची पायाभरणी

Chandrakant Patil : ब्रिटिशांची शिक्षण पद्धती त्यांच्या स्वार्थासाठी व राज्य चालविण्यासाठी होती.
 Chandrkant Patil
Chandrkant PatilSarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे ही 20 वर्षांची मागणी अखेर आज प्रत्यक्षात आली. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) तसेच राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe Patil) यांच्या हस्ते पुणे विद्यापीठ उपकेंद्राच्या पायाभरणीचे भूमिपूजन आज झाले. अहमदनगर जिल्ह्यातील बाबुर्डी घुमट येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्यात येणार आहे. (Latest Marathi News)

यावेळी चंद्रकांत पाटील, यात 92 नगरपंचायती व चार नगरपालिका यांना ओबीसी आरक्षण लागू करण्याबाबत याचे नोटिफिकेश निघाले आहे असे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे होते. सरकारच्या मते नोटिफिकेशन निघाले नव्हते. त्यामुळे त्यांनाही ओबीसी आरक्षण लागू करा आणि 2011नंतर प्रभाग सेंसर झालेले नाहीत. 2017 व 2022ला लोकसंख्या वाढ गृहित धरून नगरसेवक वाढविता येत नाही. त्यामुळे प्रभाग रचना बदलता येत नाही. 2011च्या जनगणनेनुसार अंदाजे लोकसंख्या गृहित धरून प्रभाग रचना करता येत नाही. या याचिकेचा निकाल अजून लागायचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, ज्यावेळी तीनचा प्रभाग झाला तेव्हा काहींनी याला न्यायालयात आव्हान दिले. या याचिकेचा निकाल आज लागला. नव्या राज्य सरकारने चार नगरसेवकांचा प्रभाग केला आहे. त्याला न्यायालयात आव्हान दिलेल्या याचिका आहेत. त्या याचिकांचा निकाल दीड महिन्यांनी म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या शेवटी सुनावणी सुरू होईल. त्याचा निकाल काय लागतो ते पाहू. तो पर्यंत निवडणुका होणार नाहीत. कारण सर्वोच्च न्यायालयानेच पाच आठवड्यांचा कालावधी मागितला होता, असे त्यांनी स्पष्ट केले.

 Chandrkant Patil
राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटणार : भाजप-शिंदे गट-मनसे युतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता!

पुणे विद्यापीठाच्या नगर उपकेंद्रा बाबत ते म्हणाले, ब्रिटिशांनी आपल्यावर जी शिक्षण पद्धती लादली ती त्यांच्या स्वार्थासाठी व त्यांचे राज्य चालविण्यासाठी होती. त्या जोखडातून आपण बाहेर पडू. खऱ्या अर्थाने भारतीय शिक्षण तरुण, तरुणींना मिळणे, त्यांच्या हाती काम मिळणे. त्यापेक्षा महत्त्वाचे देशाप्रती व आई-वडिलांप्रती श्रद्धा असलेले व संस्कार असलेले प्रशिक्षण त्यातून निर्माण होईल. त्यासाठी युनिट छोटे करण्यात येत आहेत. पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत सुमारे 900 महाविद्यालये आहेत. जसे नाशिकला उपकेंद्र दिले तसे नगरला द्याचे. त्यामुळे नगर केंद्राअंतर्गत केवळ 229 महाविद्यालये येतील, असे त्यांनी सांगितले.

 Chandrkant Patil
ज्यांनी आपल्यावर 250 वर्षे राज्य केले, आज आपण त्यांच्या पुढे - नरेंद्र मोदी

या उपकेंद्रासाठी बऱ्याच वेळा जागा मिळत नव्हती. त्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गावकऱ्यांशी चर्चा करून ही जागा आत्ता मिळाली. या उपकेंद्राची पायाभरणी झाली आहे. दोन-सव्वादोन वर्षात ही इमारत पूर्ण होईल. गायरान उरलेले नाही अशी गावकऱ्यांची तक्रार आहे. विखे पाटील हे महसूल मंत्री आहेत. गायरानसाठी जागा उपलब्ध करून देतील. गावकऱ्यांनीही लक्षात घ्यायला हवे की देशातील पहिल्या दहा विद्यापीठांत असलेले तसेच महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे पुणे विद्यापीठाचे आपल्या गावात उपकेंद्र होत आहे ही आपली मोठी शान आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

या केंद्रामुळे गावात ये-जा वाढेल. त्यामुळे गावात रोजगार वाढेल. आपल्या मुलांना त्याचा लाभ होईल. या उपकेंद्रात नोकऱ्या देताना गावातील लोकांचा नक्की विचार करू. स्थानिकांना नोकऱ्या दिल्या पाहिजे हा आमचा आग्रह आहे, असे आश्वासन त्यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com