Mohite Patil : मोहिते पाटलांनी जयकुमार गोरेंना डिवचले; ‘झेडपी निवडणुकीत पालकमंत्र्यांना सोलापूरचे पाणी दाखवू’

Zilla Parishad Election 2026 : झेडपी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धैर्यशील मोहिते पाटील यांनी जयकुमार गोरे यांच्यावर जोरदार टीका केली. सोलापूरकर स्वाभिमानी असल्याचा इशारा देत भाजपचा सुपडा साफ करू, असे आव्हान दिले.
Dhairyasheel Mohite Patil
Dhairyasheel Mohite PatilSarkarnama
Published on
Updated on

Pandharpur, 24 January : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने पालकमंत्री जयकुमार गोरे आणि मोहिते पाटील यांच्यातील वादाला नव्याने तोंड फुटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराच्या सभेत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पालकमंत्री गोरे यांना डिवचले आहे. सोलापूर जिल्ह्यातील जनता स्वाभिमानी आहे. त्यांना डिवचायला जाऊ नका. लोकसभा, विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकीत तुमचा सुपडासाफ केला. आता झेडपी निवडणुकीतही तुमचा सुपडा साफ करू आणि सोलापूरचे पाणी काय असते, हे दाखवून देऊ, असा इशारा मोहिते-पाटील यांनी दिला आहे.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता.२४ जानेवारी) मेंढापूर (ता.पंढरपूर) येथे दुधेश्वर मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. त्या सभेत बोलताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी पालकमंत्री गोरे यांना थेट इशारा दिला आहे.

दरम्यान, ‘तिजोरीच्या चाव्या ह्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहेत. आमचा निधी आता कोणी आडवू शकत नाही,’ अशा शब्दांत आमदार अभिजित पाटील (Abhijeet Patil) यांनी भाजप नेत्यांना डिवचले आहे. त्यांच्या विधानावरून पुन्हा एकदा राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

खासदार मोहिते पाटील म्हणाले, पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोलापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या खासदार आणि आमदारांना डीपीडीसीचा निधी देताना दुजाभाव करतात. अधिकाराचा गैरवापर करून नियम धाब्यावर बसवून जे पराभूत झाले आहेत, अशा लोकांना निधीची खिरापत वाटली जात आहे, या प्रश्नावर आता उच्च न्यायालयात जाऊ.

Dhairyasheel Mohite Patil
Shivsena-Shivsena UBT Yuti : दोन्ही शिवसेना अखेर एकत्र; बार्शीतील दिलीप सोपलांच्या प्रयोगाची राज्यभरात चर्चा

पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर हे सोलापूर जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. या भागात एक हजार एकर जमीन उपलब्ध करून विमानतळ उभारण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. येथून कार्गो विमानसेवा सुरू झाली, तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. पंढरपूरकडे येणारे सर्व महामार्ग झाले आहेत. यासाठी विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केले. यापुढच्या काळात या भागाचा विकास करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू राहणार आहेत, असेही मोहिते पाटील यांनी स्पष्ट केले.

Dhairyasheel Mohite Patil
Maharashtra Politic's : स्वाभिमानी अजितदादांनी आता निर्णय घ्यावा : काँग्रेस नेत्याच्या गुगलीने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ

ते म्हणाले, भीमा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठपुरावा केला आहे. त्यानुसार येत्या २८ ते ३० जानेवारी पासून दिल्ली येथील प्रदूषण नियंत्रण मंडाळचे अधिकारी पुणे ते पंढरपूरदरम्यान सर्वे करुन अहवाल तयार करणार आहेत. तो अहवाल केंद्र आणि राज्य सरकारला देणार आहेत. नदी प्रदूषणाचा प्रश्नही लवकरच मार्गी लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com