संपूर्ण सत्तेसाठी महाडिक पिता-पुत्र ताकदीने उतरले राजकीय आखाड्यात!

मोहोळ तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप चिन्हावर लढवणार : धनंजय महाडिक
 Dhananjay Mahadik
Dhananjay MahadikSarkarnama

मोहोळ (जि. सोलापूर) : भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा भीमा कारखान्याचे अध्यक्ष धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) व चिरंजीव विश्वजीत महाडिक हे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहोळ तालुक्‍याची संपूर्ण सत्ता मिळविण्यासाठी ताकदीने उतरले आहेत. तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन-उद्‌घाटनांच्या निमित्ताने महाडिक प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावत आहेत. ज्या ठिकाणी महाडिकांना येणे शक्‍य नाही, अशा ठिकाणी त्यांचे चिरंजीव विश्वजीत हजेरी लावत आहेत, त्यामुळे मोहोळ तालुक्‍यातील महाडिक गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे. (Local body elections in Mohol will be contested on BJP symbol : Dhananjay Mahadik)

मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा साखर कारखान्यावर आयोजित पत्रकार परिषदेत महाडिक बोलत होते. ते म्हणाले की, गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत आम्ही थोड लक्ष दिले होते, तरीही मोहोळ तालुक्‍यातील जनतेने आम्हाला निम्मी सत्ता दिली. या वेळी गेल्या वर्षीपेक्षा वातावरण चांगले आहे. त्यामुळे येत्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका या भाजपच्या चिन्हावर समविचारींना सोबत घेऊन लढविणार आहे, यात भरघोस यश मिळेल. या वेळी विरोधकांचा सुपडासाफ करण्यासाठी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.

 Dhananjay Mahadik
चंद्रकांतदादा...पियूष गोयलांनी त्यावेळी राज्याकडून प्रवाशांची यादी मागितली होती : राष्ट्रवादीचे उत्तर

‘‘गेल्यावेळी आम्हाला निम्मी सत्ता मिळाल्यावर तालुक्यातील अनेक गावांतील सर्वसामान्याला त्याचा फायदा झाला. विविध शासकीय योजनांचा लाभ त्यांना मिळाला. मात्र, कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली कामे सर्वसामान्यांपर्यंत पोचविणे गरजेचे आहे,’’ असेही महाडिक यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

 Dhananjay Mahadik
राष्ट्रवादीत इनकमिंग जोरात; भाजपच्या निवडणूक सूत्रधाराचा प्रवेश, नगराध्यक्षांचे पतीही संपर्कात

मोहोळ तालुक्‍यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांत मोठा संघर्ष आहे. महाविकास आघाडी सरकारचे दररोज उघड होणारे नवनवीन घोटाळे, शेतकऱ्यांची वीजतोडणी यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आहे. त्याचा फायदा आम्हाला होणार आहे, असा दावाही कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी केला आहे.

 Dhananjay Mahadik
राष्ट्रवादीचे आमदार मानेंना आपल्याच शब्दाचा विसर; दीड वर्षानंतरही विजेचा प्रश्न कायम

सध्या पूर्ण क्षमतेने सुरु असलेला ’भीमा’चा गळीत हंगाम, शेतकरी, कामगार, ऊस पुरवठादार यांचे दिलेले पैसे, कुठलेही राजकारण न करता सुरू असलेले गाळप, या अध्यक्ष महाडिक व भीमा परिवाराच्या मोठ्या जमेच्या बाजू आहेत. त्यामुळे येत्या जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भाजपचाच झेंडा फडकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com