अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र नागरिक कोरोना विषयक नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासन योग्यत्या उपाययोजना राबवित आहे. Lockdown of 61 villages in Ahmednagar district
जिल्ह्यातील नगर, जामखेड व राहुरी तालुका वगळता जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांतील ग्रामीण भागांत कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार संबंधित तालुक्यातील तहसीलदारांनी जास्त रुग्ण संख्या असलेली गावे लॉकडाऊन करण्यास सुरवात केली आहे. काल संध्याकाळपर्यंत जिल्ह्यातील 61 गावे लॉकडाऊन करण्यात आली. यात सर्वाधिक म्हणजे 24 गावे एकट्या संगमनेर तालुक्यातील आहेत.
लॉकडाऊन झालेल्या गावांत अकोले तालुक्यातील लिंगदेव, वीरगाव, परखतपूर, कर्जत तालुक्यातील खांडवी, बाभूळगाव दुमाला, कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव, नेवासे तालुक्यातील कुकाणा, पारनेर तालुक्यातील वडनेर बुद्रुक, कान्हुरपठार, गोरेगाव, दैठणे गुंजाळ, जामगाव, भाळवणी, पाथर्डी तालुक्यातील तिसगाव, राहाता तालुक्यातील भगवतीपूर, पिंप्री निर्मळ, अस्तगाव, कोऱ्हाळे, लोणी बुद्रुक, लोणी खुर्द, कोल्हार बुद्रुक यांचा समावेश आहे.
तर संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी, शेडगाव, निमगाव जाळी, आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द, पारेगाव बुद्रुक, पानोडी, शिबलापूर, बोटा, उंबरी, पिंपरणे, वेल्हाळे, खळी, देवगाव, घुलेवाडी, कोल्हेवाडी, वडगाव लांडगा, तळेगाव, घारगाव, चंदनापुरी, कनोली, निमोण, वडगाव पान, सायखिंडी, शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव, घोटण, दहिगावने, आव्हाणे बुद्रुक, श्रीगोंदे तालुक्यातील लोणी व्यंकनाथ, घारगाव, बेलवंडी, मढेवडगाव, शेडगाव, येळपणे, कौठा, कोळगाव, काष्टी, श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द, उक्कलगाव व कारेगाव ही गावे लॉकडाऊन करण्यात आली आहेत.
तालुका निहाय गावांची संख्या
अकोले 3, कर्जत 2, कोपरगाव 1, नेवासे 1, पारनेर 6, पाथर्डी 1, राहाता 7, संगमनेर 24, शेवगाव 4, श्रीगोंदे 9, श्रीरामपूर 3.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.