Lok Sabha Election 2024 : यशवंतरावांच्या भूमीतून ठरणार इंडिया आघाडीची रणनीती; काय आहे प्लॅन?

Congress Politics : राजकारणात व्यक्ती किंवा उमेदवार यापेक्षाही पक्ष व त्याची ध्येय धोरणे महत्वाची असतात. पक्ष म्हणून कार्यकर्ते, नेते जोडले जातात.
Congress
CongressSarkarnama

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडीया आघाडीची सातारा लोकसभा मतदारसंघात घट्ट पकड झाली आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या भूमीत कऱ्हाड तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांचा रविवारी (ता. 31 मार्च) मेळावा होत आहे. या मेळाव्यात इंडिया आघाडीची ध्येय धोरणे आणि निवडणूक लढविण्याची रणनिती ठरविण्यात येणार आहे, अशी माहिती माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिली.

बाळासाहेब पाटील म्हणाले, देशात इंडीया आघाडीची (INDIA Alliance) स्थापना झाली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यापर्यंत त्याचा उद्देश व निवडणुकीची रणनीती ठरविण्याच्या दृष्टीने महत्वाच्या बैठका घेण्याचे काम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी कऱ्हाडला मेळाव्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात जिल्ह्यातील माझ्यासह आघाडीचे नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithwiraj Chavan), श्रीनिवास पाटील यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. त्या मेळाव्याला जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे. सातारा येथे मेळावा झाला आहे. मेढा, पाटण, जावळी, कोरेगाव येथेही मेळावे आहेत. त्याही मेळाव्यांना चांगला प्रतिसाद मिळणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Congress
Sunetra Pawar : महाभारताचा दाखला देत सुनेत्रा पवारांचा 'भावकी'वर निशाणा

राष्ट्रवादीचा उमेदवार निश्चित नसताना आपण मेळावे घेत आहात. त्या मेळाव्यात उमेदवार म्हणून कोणाला पुढे करणार, या प्रश्नावर आमदार पाटील (Balasaheb Patil) म्हणाले, राजकारणात व्यक्ती किंवा उमेदवार यापेक्षाही पक्ष व त्याची ध्येय धोरणे महत्वाची असतात. पक्ष म्हणून कार्यकर्ते, नेते जोडले जातात. व्यक्ती म्हणून नाही. उमेदवार ठरविण्याची प्रक्रीया वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. ती पूर्ण झाली की, आघाडी जो उमेदवार देईल, त्याचा ताकदीने प्रचार आम्ही करणार आहोत. तुम्हीही निवडणूक लढवावी, अशी चर्चा होती. त्याबद्दल काय सांगाल, यावर पाटील म्हणाले, ती चर्चा होती. अशा चर्चा होत राहतात. त्याकडे फारसे लक्ष देत नाही.

Congress
Pratap Patil Chikhalikar : प्रताप पाटील चिखलीकर 25 वर्षांनी अशोक चव्हाणांच्या घरी

काँग्रेसचे (Congress) मनोहर शिंदे म्हणाले, मेळाव्याला जास्तीत जास्त कार्यकर्ते सहभागी होतील. त्या दृष्टीने आघाडी म्हणून आम्ही एकत्रीत प्रयत्न करत आहोत. त्यात निश्चित यश येणार आहे.आघाडीचा उमेदवार ठरला तर त्यांच्यासहीत मेळावा होईल. शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे हर्षद कदम म्हणाले, महाविकास आघाडी जो उमेदवार देईल, त्याचा आम्ही ताकदीने प्रचार करणार आहोत. त्यासाठी प्रामाणीकपणे पाटण तालुक्यासहीत जिल्ह्यात शिवसेना म्हणून आम्ही आमचे प्रयत्न करणार आहोत.

यावेळी काँग्रेसचे दक्षिण तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षद कदम, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, मानसिंगराव जगदाळे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस संगीता साळुंखे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नंदकुमार बटाणे, शेकापचे ॲड. शरद देसाई, श्रमिक मुक्ती दलाचे ॲड. शरद जांभळे, राष्ट्रवादी दक्षिणचे तालुकाध्यक्ष पांडुरंग चव्हाण, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष प्रशांत यादव उपस्थित होते.

(Edited by Sunil Dhumal)

Congress
Nilesh Lanke News: लंके आमदारकीचा राजीनामा देणार ? पवार खासदारकीचा राजमार्ग दाखवणार ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com