Lok Sabha Election 2024 : कोल्हापुरात महायुतीमध्ये पेच, मंडलिकांसमोर अंतर्गत विरोध थोपवण्याचे आव्हान

Sanjay Mandlik News : संजय मंडलिक यांचा पत्ता कट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मंडलिक यांनी पुन्हा उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
CM Eknath Shinde, Sanjay Mandlik
CM Eknath Shinde, Sanjay MandlikSarkarnama

Kolhapur News : कोल्हापूर लोकसभा (Lok Sabha Election 2024) मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार जवळपास निश्चित झाला आहे. काँग्रेसकडून शाहू महाराज छत्रपती यांचे नाव निश्चित झाल्याचे समजते. पुढच्या काही दिवसांत त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून प्रचाराचे रणशिंग फुंकण्यात आले आहे. शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हेदेखील मैदानात उतरले आहेत. एकीकडे महाविकास आघाडीच्या गोठात प्रचाराला सुरुवात झाली असून, दुसरीकडे महायुतीमध्ये कोल्हापूरच्या जागेवरून पेच कायम आहे.

कोल्हापूर (Kolhapur) लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांच्याबद्दल नाराजीचा सूर असल्याचे सांगितले जाते. मतदारसंघात कमी जनसंपर्क असल्याचे कारण पुढे करत त्यांच्या उमेदवारी बदलाच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, मंडलिक यांनी आपल्यात उमेदवारीवर दावा ठाम करत प्रचाराला सुरुवात केली आहे. कार्यकर्त्यांनीदेखील निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून बैठक घेत उमेदवारी बदलाच्या हालचालींना ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला आहे.

CM Eknath Shinde, Sanjay Mandlik
Solapur News : ‘मुख्यमंत्री असताना मोदी बरे होते; पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या डोक्यात काय गेलं माहिती नाही’

शिवसेनेत (Shiv Sena) फूट पडल्यानंतर खासदार संजय मंडलिक यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवारीचा शब्द घेऊनच प्रवेश केल्याचे बोलले जाते. मात्र, सध्या उमेदवारी बदलाची कुणकुण लागताचं मंडलिक यांनी दबाव आणत असल्याचे सांगितले जाते. या सर्व घडामोडी कोल्हापूरच्या जागेवरून महायुतीमध्ये (Mahayuti) आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. असे असताना दुसरीकडे भाजपचे (BJP) नेते संग्रामसिंह कुपेकर यांनी उघड उघड मंडलिक यांना विरोध केला आहे. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी वारंवार महायुतीतील पक्ष एकत्र असल्याचे दावा करत असले तरी कुपेकर यांनी महायुतीतील वाद चव्हाट्यावर आणला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उघड मित्रांचा गुपित विरोध

एकीकडे महायुतीतील वाद चव्हाट्यावर येत असताना दुसरीकडे खासदार मंडलिक यांच्या उमेदवारीबाबत अनेकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली आहे. मंडलिक यांच्याबाबत असलेली नाराजी त्यांनी बोलून दाखवली आहे. त्यामध्ये केवळ आमदार प्रकाश आबिटकर व माजी आमदार चंद्रदीप नरके यांना सोडले तर कोणीही मंडलिक यांच्या उमेदवारीबाबत उघड उघड भूमिका घेतलेली नाही, तर सीमाभागातील एका नेत्याने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मंडलिक यांच्या उमेदवारीला विरोध केल्याची माहिती आहे.

सर्व गोष्टींचा विचार करून महायुतीतील उमेदवार घोषित झाल्यावर तीन पक्ष एकत्र येतील का, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे विरोध करणाऱ्यांची समजूत नेमकी कशी काढणार, हे मोठे आव्हान महायुतीतील नेत्यांसमोर असणार आहे.

R

CM Eknath Shinde, Sanjay Mandlik
Mohite Patil Group News : रणजितदादा दिल्लीत; धैर्यशील मोहिते पाटलांकडून प्रचाराला सुरुवात, माढ्यात भाजपची अडचण वाढणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com