Makrand Patil News : "...तर शिंदे, अजितदादा अन् फडणवीस मला माफ करणार नाहीत," मकरंद पाटील असं का म्हणाले?

Lok sabha election 2024 : सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराच्या निमित्त आयोजित सभेत मकरंद पाटील बोलत होते.
makrand patil
makrand patilsarkarnama

Satara News, 4 May : तुम्ही गडबड केली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ), उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ), देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) हे मंडळी मला माफ करणार नाहीत. आता माझ्याबाबतचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. वाई विधानसभा मतदारसंघातून छत्रपती उदयनराजे भोसले यांना मताधिक्य द्यायचे आहे. या मतदारसंघातील मतदारांनी कोणतेही वेडेवाकडे पाऊल टाकू नये, असे आवाहन वाई, खंडाळा, महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील यांनी केले.

सातारा लोकसभा मतदारसंघाचे ( Satara Lok Sabha Constituency ) महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosale ) यांच्या प्रचाराच्या निमित्त आयोजित सभेत मकरंद पाटील बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ), देवयानी फरांदे ( Devyani Farande ), नितीन पाटील, धैर्यशील कदम, शशिकांत पिसाळ, यांची प्रमुख उपस्थिती होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मकरंद पाटील म्हणाले, "या मतदारसंघातील दोन कारखान्यांची जबाबदारी आपण घेतली आहे. 1000 कोटींचे कर्ज डोक्यावर घेतलं असून या संस्था अडचणीत आहेत. चार वर्षे झालं कारखान्यावर जप्ती नोटीसा असून या पार्श्वभूमीवर अजितदादांसोबत जाण्याचा निर्णय तुम्हाला विचारुन घेतला आहे. अजितदादा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस असतील तीनही नेत्यांनी आपल्या कारखान्यांना थकहमी देण्याचा निर्णय घेतला आहे. 13 कारखान्यांत आपल्या दोन कारखान्यांना 500 कोटी देण्याचा निर्णय दादांच्या व सरकारच्या माध्यमातून झाला आहे. हे विसरता येणार नाही."

"85 हजार सभासदांचे जीवन या दोन्ही कारखान्यांवर अवलंबून आहे. त्यामुळे या निवडणुकीत तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागणार आहे. आपल्याला जबाबदारीपासून दूर जात येणार नाही. कोणी काहीही सांगितले तरी जबाबदारीपासून दूर जाता येणार नाही. या संस्था वाचविण्यासाठी उदयनराजेंना प्रचंड मताधिक्य द्या. ही जबाबदार माझी असून काही वेडे वाकडे घडले तर याचा जाब मला विचारला जाईल. दादा, मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस हे मला विचारणार आहेत. मकरंद असे का घडलं. विकासाची कोट्यवधींची कामे या मतदारसंघात केली आहेत," असं मकरंद पाटील यांनी म्हटलं.

makrand patil
Ajit Pawar Baramati : इकडं-तिकडं पदाधिकाऱ्यांना अजितदादांचा सज्जड दम; म्हणाले...

नितीन पाटलांना तिकीट का मिळाले नाही?

"नितीन पाटील हे लोकसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक नव्हते. पण, अजित दादांची इच्छा होती की नितीनला उमेदवारी द्यायची. महायुतीत असलेल्या पक्षात जागा वाटपात ही जागा भाजपला गेली. नितीन पाटील यांना उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्ते मतदारसंघातील कार्यकर्ते नाराज झाले. लोकांमध्ये समज झाला की मीही नाराज आहेत. आता कार्यकर्तेही नाराज, असा मेसेज वाई मतदारसंघात गेला. जिल्ह्यातील लोकसुद्धा म्हणायला लागली मकरंद आबा वाई विधानसभेतून लोकसभेचे काम कधी सुरु होणार. पण, काळजी करु नका, हा या मतदारसंघातील मतदार व कार्यकर्ता विचाराने बांधला गेलेला आहे. क्षणिक मोहाने एखाद्या गोष्टीने सैरभैर होणारा कार्यकर्ता नाही. अजितदादांना मानणारा कार्यकर्ता आहे. तमाम कार्यकर्त्यांना आव्हान करेन ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी महत्वाची आहे," असं मकरंद पाटील यांनी सांगितलं.

( Edited By : Akshay Sabale )

makrand patil
Ajit Pawar News : 'भटकती आत्मा' कोणाला म्हटलं हे पंतप्रधानांना विचारणार? अजित पवार म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com