Narendra Modi Satara : देशात लवकरच मोठं कांड होणार? PM मोदी नेमके काय म्हणाले?

Udayanraje Bhosale : मी तंत्रज्ञानाचा उपयोग चांगल्या कामांसाठी करतो. त्यातून मी तुमच्याशी संवाद साधतो. तुमच्यापर्यंत पोहाेचून गरजा जाणून घेतो. त्यातून योजनांची माहिती देतो, असे सांगून विरोधक मात्र समाजात तेढ निर्माण करण्यासाठीच सोशल मीडियाचा वापर
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Satara Political News : सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही सोशल मीडियाचा उपयोग लोकांच्या भल्यासाठी करतो. विरोधक मात्र त्यातून समाजात फूट पाडत आहेत, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांवर केला. लोकांनी अशा खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नये. खोट्या व्हिडिओची माहिती पोलिसांना द्यावी. नाहीतर येणाऱ्या काळात देशात एखादे मोठे कांड होण्याची शक्यता असल्याची भीती मोदींनी व्यक्त केली. याबाबत निवडणूक आयोगाला लक्ष देण्याची विनंती करणार असल्याचेही मोदींनी सांगितले. Congress viral fake video of Narendra Modi.

साताऱ्यातील कराड येथे सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांच्या प्रचारार्थ मोदींची सभा पार पडली. या वेळी त्यांनी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, मी तंत्रज्ञानाचा उपयोग चांगल्या कामांसाठी करतो. त्यातून मी तुमच्याशी संवाद साधतो. तुमच्यापर्यंत पोहाेचून गरजा जाणून घेतो. त्यातून योजनांची माहिती देतो, असे सांगून विरोधक मात्र समाजात तेढ निर्माण करण्यासाठीच सोशल मीडियाचा वापर करत असल्याचा आरोप मोदींनी केला.

विरोधकांकडून मात्र फेक व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. त्या व्हिडिओत माझा, केंद्रीय मंत्री अमित शाह Amit Shah, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आवाज असतो. ते व्हिडिओ एआयच्या माध्यमातून तयार केले जातात. आमच्या तोंडात नको ते विधाने टाकले जात आहेत. त्यांना माहिती आहे की शांततापूर्ण निवडणूक होते, तोपर्यंत त्यांची डाळ शिजणार नाही. त्यामुळे येणाऱ्या महिनाभरात काही ना काही मोठे कांड होण्याची शक्यता आहे. त्यातून विरोधक आपले इरादे पूर्ण करण्याचे प्रयत्न करतील, असा गंभीर आरोप मोदींनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Narendra Modi
Omraje Nimbalkar News : "खेकडा मंत्री, बॉयलर कोंबडीचे अंडे अन्...", ओमराजेंची सावंतांवर घणाघाती टीका

विरोधकांचा हा समाजात तेढ निर्माण करण्याचे इरादे मोडून काढण्यासाठी लोकांनी सतर्क राहण्याचे आवाहनही मोदींनी Narendra Modi केले. ते म्हणाले, लोकशाहीच्या भल्यासाठी, देशातील एकतेसाठी असे खोटे व्हिडिओ आले तर ते पुढे पाठवू नका. त्याबाबत पोलिसांना कल्पना द्या. असे व्हिडिओ पुढे पाठवले तर त्याविरोधातील कायदा कडक करण्यात आला आहे. आता त्यांच्यावर निवडणूक आयोगानेही लक्ष द्यावे, अशी विनंती करणार असल्याचेही मोदींनी या वेळी स्पष्ट केले.

R

Narendra Modi
Nashik Constituency 2024 : कांदा निर्यातीवरून जयंत पाटलांनी भाजपला फटकारले; महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गुजरातसाठी काम करतात का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com