लोकसभा मतदारसंघातून आमदार प्रकाश आवाडे यांनी माघार घेतली आहे. आवाडे यांचे बंड थंड करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आले आहे. निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर आवाडे हे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचा अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रवाना झाले आहेत.
हातकणंगले मतदारसंघातील विद्यमान खासदार धैर्यशील माने ( Dhairyasheel Mane ) यांच्या उमेदवारीला गेल्या महिनाभरापासून आवाडे व त्यांच्या कुटुंबीयांकडून उघड विरोध केला होता. आवाडे यांचे पुत्र व माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे ( Rahul Awade ) यांनी सुरुवातीला स्वतःच लोकसभा लढणार, अशी घोषणा केली.
त्यासाठी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून लढण्याची तयारीही दर्शवली होती. पण, तत्पूर्वीच माने यांची महायुतीचे उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर राहुल हे शांत झाले होते. मात्र, अंतर्गत त्यांचा माने यांना असलेला विरोध कायम होता. आज प्रकाश आवाडे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने विरोध मावळला आहे. ताराराणी पक्षाकडून आमदार प्रकाश आवाडे यांनी लोकसभा लढवण्याची घोषणा केली होती. आवाडे हे लोकसभेच्या मैदानात उतरल्याने हातकणंगले मतदारसंघातील लढत पंचरंगी होणार होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल आवाडे यांनीच आमदार प्रकाश आवाडे हे लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी ताराराणी आघाडीच्या माध्यमातून रिंगणात उतरण्याची घोषणा त्यांनी केली होती. रविवारी ( 14 एप्रिल ) कोल्हापूरच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांचीही आवाडेंनी सहकुटुंब भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत राहुल आवाडे, त्यांच्या पत्नी मौसमी उपस्थित होत्या. बंद खोलीतील या चर्चेनंतरही आवाडे हे लढण्यावर ठाम आहेत. एवढेच नव्हे, तर ते मंगळवारी (ता. 16) अर्जही भरणार होते.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.