Raju Shetti : महाविकास आघाडीला गळ पण प्रतिसाद नाहीच! आता इरादा पक्का, राजू शेट्टी म्हणाले...

Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीने उमेदवार उभा केला तर लढत तिरंगी होईल नाही, अन्यथा दुरंगी होईल. मतदार माझ्या मागे उभा आहे.
Raju Shetti
Raju ShettiSarkarnama

Hatkanangle Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूरमधून काँग्रेसने छत्रपती शाहू महाराज, सांगलीतून शिवसेना ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटलांना (Chandrahar Patil) उमेदवारी जाहीर केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीनेही हातकणंकगले लोकसभा मतदारसंघाबाबत निर्णय घेतलेला नाही. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी पाठिंब्यासाठी महाविकास आघाडीला गळ घातलेली आहे. मात्र शेट्टींच्या आवाहनाला अद्याप आघाडीने प्रतिसाद दिला नाही. मी माझे काम केले आहे. आता आघाडीने साद देऊ अगर न देवो मी लढणारच, असे म्हणत राजू शेट्टींनी हातकणंगलेत एकला चलो ची भूमिका घेतली आहे.

शेट्टी म्हणाले, महाविकास आघाडी किंवा महायुतीच्या जागा वाटपाचे काय झाले याची चौकशी करणे हे माझे काम नाही. आता मतदारसंघातील (Hatkanangle) भेटीगाठींचा पहिला राऊंड पूर्ण झालेला आहे. माझे काम सुरुच आहे. महाविकास आघाडीने उमेदवार उभा केला तर लढत तिरंगी होईल नाही, अन्यथा दुरंगी होईल. मतदार माझ्या मागे उभा आहे. त्यामुळे काहीही झाले तरी मी लढणारच आहे, असा विश्वास व्यक्त करत शेट्टींनी आली तर आघाडी सोबत नाही तर आघाडीशिवाय लढण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे.

Raju Shetti
Eknath Khadse News : नाथाभाऊंचा मोठा माइंड गेम, रक्षा खडसेंच्या उमेदवारीबाबत भाजप काय निर्णय घेणार?

दरम्यान, आघाडीच्या वतीने राजू शेट्टींना (Raju Shetti) साद घालण्यात आलेली होती. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने ठाकरे गटाने हातकणंगणेतून उमेदवार देण्याची तयारी केली होती. त्यानंतर राजू शेट्टींनी तातडीने मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे. यावर शेट्टी म्हणाले, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी मी दोन वेळा चर्चा केली आहे. त्यावरून ते उमेदवार न देण्याच्या मानसिकतेत आहेत, असे संकेत मला मिळालेत. उमेदवारी दिली तर काय होईल आणि नाही दिली तर काय होईल या सर्व गोष्टी त्यांच्यासमोर मांडलेल्या आहेत. शेवटी पक्ष म्हणून त्यांनी निर्णय घ्यायचा आहे, असेही शेट्टींनी स्पष्ट केले.

इलेक्ट्रॉनिक बॉण्डवरून शेट्टींनी भाजपवर (BJP) निशाणा साधला. ते म्हणाले, एकीकडे गोवंश हत्या बंदी कायदा करायचा आणि दुसरीकडे मॉब लीचिंगद्वारे गोरगरिबांना ठेचून मारणार यांच्यावर कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करायची. दुसरीकडे बीफ निर्यात करून पैसा कमवायचा आणि बीफ निर्यात करणाऱ्यांकडून इलेक्ट्रॉन बॉण्ड मिळवायचे. भाजप नेत्यांच्या कथनी आणि करणीमध्ये फरक आहे. त्यांचा राष्ट्रवादी आणि वैचारिक भूमिका संशयास्पद असल्याची टीका शेट्टींनी केली.

(Edited by Sunil Dhumal)

Raju Shetti
Lok Sabha Election 2024 : प्रतापराव जाधवांना तिकीट मिळाल्यास काम करणार नाही, कुणी दिला इशारा ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com