Lok Sabha Election : निवडणुका येताच उंडाळकरांची बदलली वेशभूषा; पॅन्ट-शर्टमध्ये दिसणारे सलवार-कुर्ता अन् जॅकेट...

Udaysinh Patil Undalkar : निवडणुका येताच नेत्यांचे बदलले पोशाख...
Udaysinh Patil Undalkar
Udaysinh Patil Undalkar Sarkarnama
Published on
Updated on

Karad News : लोकसभेची निवडणूक जशजशी जवळ येऊ लागली आहे, तसतशी अनेकांची नावे पुढे येत आहेत. यामध्ये सातारा लोकसभेसाठी कराडचे नेते ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्याही नावाची चर्चा आहे. सध्या ते भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगली आहे. त्यातच त्यांची बदललेली वेशभूषा यामध्ये भर घालत आहे. नेहमी शर्ट पॅन्ट वापरणारे ॲड. उदयसिंह उंडाळकर आता सलवार कुर्ता वापरू लागले आहेत. त्यांचा हा बदललेल्या लुकने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सातारा लोकसभा मतदारसंघ (Lok Sabha) सध्या हॉट बनला आहे. महायुतीतील सर्व पक्षांनी या मतदारसंघावर दावा केला आहे. त्यातच उदयनराजेंनी तर तयारीच सुरू केली आहे. पण, सध्या उदयनराजेंच्या उमेदवारीबाबत कोणताचा भाजपचा नेता बोलत नसल्याचे चित्र आहे. पण, त्यांनी आज वाढदिवसाच्या निमित्ताने जनतेतून निवडून येऊन लोकसभेत जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपमधून मात्र नवीन चेहऱ्याला संधी दिली जाण्याची चर्चा आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष कोण नवीन चेहरा असेल याकडे आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सातारा (Satara) लोकसभा मतदारसंघासाठी (Lok Sabha) कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांचेही नाव चर्चेत आहे. ते भाजपच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. त्यांचे कार्यकर्तेच अशी चर्चा करू लागले आहेत. त्यातच त्यांनी आपली वेशभूषाही बदलली आहे. नेहमी शर्ट पॅन्ट वापरणारे उदयसिंह आता सलवार कुर्ता वापरू लागले आहेत. उंडाळकर कुटुंबात जॅकेट कोणच वापरत नाही. मात्र, उदयसिंह जॅकेट वापरू लागल्याने त्यांच्या बदलेलेल्या या लूकने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

(Edited By - Chetan Zadpe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com