Udayanraje Bhosale : जिंकले तरी उदयनराजेंची नाराजी; काय आहे कारण?

Udayanraje Bhosale Vs Shashikant Shinde : सातारा लोकसभेच्या निवडणुकीची मतमोजणी झाली. यामध्ये उदयनराजे भोसले यांनी शशिकांत शिंदे यांचा पराभव केला आहे.
udayanraje bhosale
udayanraje bhosalesarkarnama

Satara News, 4 June : सातारा लोकसभा मतदारसंघात ( Satara Lok Sabha Constituency ) भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव करत तब्बल 32 हजार 771 मतांनी विजय मिळविला.

या विजयी मतांवर उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosale ) यांनी मात्र, नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक जिंकली हे सत्य असले तरी मला थोडा वेळ द्या. त्यावर मी नंतर बोलेन, असे स्पष्ट करत त्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्व आमदारांचे व मतदारांचे त्यांनी आभार मानले आहेत.

सातारा लोकसभेच्या निवडणुकीची मतमोजणी झाली. यामध्ये महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा तब्बल 32 हजार 771 मतांनी विजय झाला. निकाल जाहीर झाल्यानंतर उदयनराजे भोसले हे मतमोजणी केंद्रात गेले. त्यांनी विजयाचे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते स्विकारले. यानंतर त्यांनी पत्रकारांपुढे आपल्या भावना व्यक्त केल्या.

udayanraje bhosale
Udayanraje Win In Satara Loksabha : कॉलरची शान वाढली; साताऱ्यात बाजी पलटली, उदयनराजेंनी मैदान मारलं

उदयनराजे म्हणाले, "माझ्या आयुष्यात मी जेवढा वेळ दिला. त्यात मी काय मिळवलं. मी निवडणूक जिंकली हे सत्य आहे. लोक कशाकडं बघुन मत देतात हे कळत नाही. भ्रष्टाचार करायचा असेल भ्रष्टाचार करु द्या," असा चिमटा त्यांनी विरोधकांना काढला.

मी पराभवाचा वचपा काढला नाही, फक्त मला पटत नाही ते मी करत नाही. गेल्या वेळी मी जिंकून देखील पहिल्या तीन महिन्यात राजीनामा दिला होता, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई, धैर्यशिल पाटील, मनोज घोरपडे, शिवेंद्रसिंहराजे आणि महेश शिंदे यांचे आभार मानले. .

सातारा लोकसभा मतदारसंघात उमेदवारनिहाय पडलेली मते अशी -

उदयनराजे भोसले : पाच लाख 71 हजार 134, शशिकांत जयवंतराव शिंदे : पाच लाख 38 हजार 363, आनंद रमेश थोरवडे : 6 हजार 485, प्रशांत रघुनाथ कदम :11 हजार 912, तुषार विजय मोतलिंग : 1 हजार 301, सयाजी गणपत वाघमारे : 2 हजार 501, डॉ. अभिजित वामनराव आवाडे बिचुकले :1 हजार 395, सुरेशराव दिनकर कोरडे : 4 हजार 712, संजय कोंडिबा गाडे : 37 हजार 62, निवृत्ती केरू शिंदे : 2 हजार 674, प्रतिभा शेलार : 1 हजार 123, सदाशिव साहेबराव बागल : 958, मारुती धोंडीराम जानकर : 3 हजार 951, विश्वजित पाटील - उंडाळकर : 3 हजार 438, सचिन सुभाष महाजन : 2 हजार 15, सीमा सुनिल पोतदार : 3 हजार 458, नोटा : 5 हजार 522.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com