Lok Sabha Election 2024 : दिल्लीच्या बैठकीत काय ठरलं? जागावाटपाबाबत अजितदादा म्हणाले...

Ajit Pawar News : जागावाटपावर तोडगा निघाला का? अजित पवारांनी जागावाटपावर केले सूचक विधान...
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Sarkarnama
Published on
Updated on

Sangli Karad News : देशात आगामी लोकसभा निवडणुका कधी होणार? त्यासाठी आचारसंहिता केव्हा लागणार? याबाबत वेगवेगळे मुहूर्त काढले जात आहेत. तसेच महाराष्ट्रात भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीचे जागावाटप केव्हा होणार, याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या दोन्ही प्रश्नांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे भाष्य केले आहे. पुढील दोनच दिवसांत म्हणजेच 14 किंवा 15 एप्रिलला देशात आचारसंहिता लागणार असून, आज किंवा उद्या जागावाटपाची दिल्लीत बैठक होणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. (Latest Marathi News)

कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह आले होते. या वेळी अजित पवार म्हणाले, "महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, संरक्षणमंत्री, उपपंतप्रधान पदापर्यंत पोहाेचलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी राजकारणात सुसंस्कृतपणा दाखवला. तोच आदर्श आम्ही ठेवला पाहिजे. राजकारणात अलीकडे वाचाळवीरांची संख्या वाढली असून, कोण खेकडा म्हणतं, कोण वाघ म्हणतो. आम्ही डोळ्यांसमोर मोठ्या व्यक्तीचा आदर्श समोर ठेवतो. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक यांनी एक वेगळा रस्ता दाखवला आहे, त्या रस्त्याने आपण गेलं पाहिजे, अशी माझी मनापासूनची भावना आहे."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जागावाटपाची आज किंवा उद्या चर्चा -

महायुतीचे जागावाटप रखडले असून, काल दिल्लीत बैठक झाली का? असे अजितदादांना विचारले असता त्यांनी काल कोणतीही बैठक झाली नसल्याचे सांगितले. मात्र, आज किंवा उद्या दिल्लीत महायुतीची बैठक होणार असून, पुढील दोन- तीन दिवसांत आचारसंहिता लागणार असल्याने जागावाटपावर तोडगा निघेल, असे अजित पवार म्हणाले.

शिवतारेंना अजितदादांचा सल्ला -

शिवसेना शिंदे गटाचे विजय शिवतारे यांनी काल अजित पवार आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासह शरद पवार यांच्यावर टीका केली होती. तसेच प्रतिआव्हानही दिले होते, यावर अजित पवार म्हणाले, "या प्रकरणावर मला काहीही बोलायचं नाही. महायुतीच्या तीन पक्षांसह सगळ्या घटकांनी, कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी राजकीय वातावरण गढूळ होईल, अशा पद्धतीचे वक्तव्य करू नये. जागावाटपाबाबत अंतिम चित्र लवकरात लवकर स्पष्ट करावं लागणार आहे. कारण देशात 14 किंवा 15 फेब्रुवारीला आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. नीलेश लंकेच्या चर्चेबाबत काहीही तथ्य नसल्याचेही अजितदादांनी (Ajit Pawar) सांगितले.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com