Ravikant Tupkar News : 'दलित, मुस्लिम मतं महाविकास आघाडीला, महायुती तिसऱ्या स्थानावर', शेतकरी नेत्याने वर्तवले भाकीत

Lok Sabha Election : राज्याच्या राजकारणात सध्या संक्रमणाची वेळ सुरु असून चांगल्या दर्जाचे आणि विचारांचे तरुण राजकारणात यायला पाहिजेत, असे रविकांत तुपकर म्हणाले.
Ravikant Tupkar
Ravikant TupkarSarkarnama

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीचा निकालाची तारीख जवळ येत आहे तसतसे उमेदवारांची धडधड वाढत आहे. चार जूनला फैसला होणार महाराष्ट्रात महायुती की महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी लढत होत असताना बुलढाणा मतदारसंघात तिरंगी लढत झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर येथून निवडणूक लढत आहे. बुलढाणा जिल्ह्यात काय स्थिती असेल यावर तुपकर यांनी भाष्य केले आहे.

'महायुती की महाविकास आघाडी आत्ताच सांगणे अवघड आहे. मात्र आमच्या बुलढाणा जिल्ह्यात दलित व मुस्लिम मते महाविकास आघाडीला हस्तांतरित झाल्याचे चित्र आहे. महायुती तिसऱ्या स्थानावर होती. मी बुलढाणा लोकसभा अपक्ष म्हणून लढवताना महायुतीचे डझनभर नेते माझ्या विरोधात येऊन बोलून गेले. मात्र अयोध्या, राम मंदिर असे कोणतेही धार्मिक मुद्दे मी माझ्या प्रचाराच्या आड येऊ दिले नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात चर्चा घडवत मी मतदार राजाचा 100 टक्के कौल मिळवला असेल.', असा विश्वास तुपकर Ravikant Tupkar यांनी व्यक्त केला.

Ravikant Tupkar
Sangli Mahayuti News : लोकसभा निकालाआधीच इस्लामपूर महायुतीत उडाले खटके; भाजपच्या जिल्हाध्यक्षावर आक्षेप

महाराष्ट्राचा दौरा करणार

राज्याच्या राजकारणात Political सध्या संक्रमणाची वेळ सुरु असून चांगल्या दर्जाचे आणि विचारांचे तरुण राजकारणात यायला पाहिजेत. प्रस्थापित राजकारण्यांच्या विरोधात जनतेच्या मनात प्रचंड चीड निर्माण झाली आहे. राजकारणातील नैतिकता संपत चालली आहे. वाडा विरुद्ध गावगाडा अशी स्थिती राज्यात आहे. राजकारणाच्या प्रवाहात विस्थापितांचे शोषण होत असून अशा विस्थापितांची मोट बांधण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर लवकरच दौरा करणार आहे, असे रविकांत तुपकर यांनी सांगितले. सातारमध्ये ‘मुक्तांगण’मध्ये तुपकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते वेळी बोलत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तरुणांची फौज उभी करणार

महाराष्ट्राची दौऱ्याची सुरुवात बुलडाणा येथून करणार आहे. पुढे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र ,पश्चिम महाराष्ट्र व कोकण असा विभागनिहाय दौरा होणार आहे. या दौऱ्यात चांगल्या विचारांचे तरुण पुढे आणून त्यांना राजकारणात सक्रिय करणे आणि शेतकरी व तरुणांचे प्रश्न घेऊन वैचारिक चळवळी वृद्धिंगत करणे हा या दौऱ्याचा मूळ हेतू असेल. महाराष्ट्र प्रस्थापितांच्या राजकारणाला बळी पडतोय तो महाराष्ट्र वाचवण्यासाठी तरुणांची मोठी फौज उभी केली करणार, असे तुपकर यांनी सांगितले.

(Edited By Roshan More)

Ravikant Tupkar
MLC Election 2024 : मुंबई पदवीधरमधून ठाकरेंचा निष्ठावंत शिलेदार मैदानात, तर शिक्षक मतदारसंघातून...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com