Loksabha Election 2024 : एक जागा अन् तीन उमेदवार; शरद पवार कुणावर शिक्का मारणार?

Satara Loksabha Constituency : सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तीन उमेदवारांची नावे चर्चेत आहेत. तिघांपैकी विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील मित्र असल्याने शरद पवार कुणाच्या नावाला पसंती देणार, याची उत्सुकता वाढली आहे.
Sarang Patil, Shriniwas Patil, Sunil Mane
Sarang Patil, Shriniwas Patil, Sunil ManeSarkarnama
Published on
Updated on

Satara Political News :

सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीतील कोणता पक्ष निवडणूक लढणार हे निश्चित झालं नसलं तरी महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार असणार, एवढं नक्की! त्यामुळे 'तुतारी' फुंकण्यासाठी माजी सहकारमंत्री आ. बाळासाहेब पाटील यांचे विश्वासू जिल्हाध्यक्ष सुनील माने तयारीला लागले आहेत. या मतदारसंघात शरद पवार यांचं मित्र खासदार श्रीनिवास पाटील यांचे नाव निश्चित मानले जात असतानाच त्यांच्याच पक्षात तिघांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. 

Sarang Patil, Shriniwas Patil, Sunil Mane
Madha Loksabha Constituency : माढ्याची रंगीत तालीम जिंकली; मोहिते पाटील आता लोकसभेच्या रिंगणात उतरणार का?

सातारा लोकसभा मतदारसंघातून (Satara Loksabha Constituency) उमेदवार महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil) यांचे नाव आघाडीवर आहे. तरीही नवा चेहरा द्यायचा झाल्यास खासदार श्रीनिवास पाटील यांचे पुत्र सारंग पाटील (Sarang Patil) आणि जिल्हाध्यक्ष सुनील माने (Sunil Mane) यांनी लोकसभा मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे.

तिघेही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP Sharadchandra Pawar) असून, उमेदवारी मिळवण्यात कोण बाजी मारणार, हे आगामी रणनीतीवर ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) कराड विभागातून उमेदवार द्यायचा झाल्यास सारंग पाटील अन् विद्यमान खासदार यांचा विचार होऊ शकतो, तर सातारा विभागातून उमेदवार म्हणून सुनील माने यांचा विचार होऊ शकतो. लोकसभेला नवा चेहरा म्हणून जिल्हाध्यक्ष सुनील माने यांना पसंती मिळू शकण्याची शक्यता सर्वाधिक असल्याने तुतारी फुंकण्यास सज्ज झाले आहेत.

सुनील माने यांचा कोरेगाव आणि कराड उत्तर विधानसभा मतदारसंघांशी थेट संपर्क आहे. 10 वर्षांपासून ते पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत. रहिमतपूर नगरपरिषदेवर त्यांचा एकहाती झेंडा राहिलेला अनेकदा पाहायला मिळाला आहे. कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या 2009 च्या निवडणुकीपासून विजयात महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. अनेकदा इतर पक्षातून सुनील मानेंना पक्ष प्रवेशाच्या चर्चा झाल्या असल्या तरी ते आजही शरद पवार यांच्यासोबत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार गटाकडून जिल्हाध्यक्ष ठाम राहिले आहेत. आमदार बाळासाहेब पाटील यांचा गट सातारा जिल्ह्यात नेहमीच वरचढ राहिला असून, 2019 मधील पोटनिवडणूक असो निवडणूक सर्वाधिक मतांचे लीड याच कराड उत्तरने दिले आहे. सातारा विभागासह कराड उत्तर आणि कोरेगावातून सुनील माने यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांसह पदाधिकारी आग्रही असल्याचे दिसत आहे. 

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तिघांमध्ये रस्सीखेच, पाटणकर बाहेर 

सातारा लोकसभेला खासदार श्रीनिवास पाटील, त्यांचे पुत्र सारंग पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने आणि जिल्हा बॅंकेचे संचालक सत्यजित पाटणकर (Satyajit Patankar) यांची नावे चर्चेत आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विजय निश्चित मेळावे घेतले तेव्हा विद्यमान खासदारांना डावलल्याचे स्पष्टपणे दिसल्याने पक्षातंर्गत त्यांना विरोध असल्याचे समोर आले.

कराड असो की पाटण बाजार समितीची निवडणूक यामध्ये खासदारांची उघडपणे पक्षाच्या बाजूने भूमिका पाहायला मिळाली नाही. त्यामुळेच सत्यजित पाटणकर यांनी आपणही रिंगणात असणार असल्याचे सांगितले असावे, असा अंदाज आता कार्यकर्त्यांकडून बांधला जात आहे.

मुंबईतील बैठकीत कराड विभागातून सारंग पाटील यांच्यासाठी उमेदवारी मागण्यासाठी गेलेल्या काहींनी सत्यजित पाटणकरांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी ऐनवेळी तेथे केली. परंतु, मेळाव्यानंतर सत्यजित पाटणकरांची चर्चा पूर्णपणे थांबली असल्याने ते लोकसभेच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.

(Edited by Avinash Chandane)

R

Sarang Patil, Shriniwas Patil, Sunil Mane
Sangli Loksabha 2024 : भाजप निरीक्षकांकडून सांगलीत चाचपणी; 157 पदाधिकाऱ्यांशी बंद खोलीत चर्चा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com