पसरणी : सत्ता असताना कै. लक्ष्मणराव पाटील यांनी सवंग लोकप्रियतेसाठी कारखान्याचा कधीच वापर केला नाही. सहकार चुकीच्या माणसाच्या हातात दिल्यावर काय होते, याचे किसन वीर साखर कारखाना हे उत्तम उदाहरण आहे, असे स्पष्ट मत सातारा जिल्हा बँकेचे संचालक नितीन पाटील यांनी व्यक्त केले आहे. प्रशासनाच्या घडीप्रमाणे जिल्हा बँकेचे कामकाज चालेल, असेही त्यांनी नमूद केले.
ओझर्डे (ता. वाई) येथे सातारा जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवडीबद्दल नितीन पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सदस्य मधुकर भोसले, ॲड. उदयसिंह पिसाळ, नितीन भोसले, रामदास इथापे, अमोल कदम, विक्रम पिसाळ, विजयसिंह पिसाळ उपस्थित होते.
नितीन पाटील म्हणाले, ''जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक शांततेत व एकमताने होईल. सहकार पॅनेलच्या काही उमेदवारांना अनपेक्षितरीत्या हार पत्करावी लागली. परंतु, किसन वीर, विलासराव उंडाळकर, अभयसिंहराजे यांनी घालून दिलेल्या प्रशासनाच्या घडीप्रमाणे बँकेचे कामकाज चालते. यापुढेही ती परंपरा बँक राखेल.''
आमदार मकरंद पाटील यांच्यावर विश्वास असल्याने खंडाळा तालुक्यातील जनतेने साखर कारखान्याची धुरा त्यांच्यावर सोपवली. तो कारखाना सुरू करण्याबाबत अध्यक्ष मदन भोसले यांनी केलेली मागणी म्हणजे लबाडी होती. पुढच्या गळीत हंगामापर्यंत हा कारखाना सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद शिंदे म्हणाले, ''जिल्हा बँकेत नितीन पाटील यांना विश्वासाने हॅट्रिक करण्याची संधी जनतेने दिली आहे."
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.