अन्यायाविरूद्ध रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे व्यक्तीमत्व हरपले...

ज्येष्ठ नेते प्रा.डॉ.एन.डी. पाटील N. D. Patil यांचे आज (सोमवारी) निधनाचे Passes away वृत्त समजताच संपूर्ण महाराष्ट्र हळहळला Maharashtra was shocked .
Prithviraj chavan, N.D. Patil
Prithviraj chavan, N.D. Patilsarkarnama
Published on
Updated on

सातारा : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचे आज कोल्हापूरात निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वसामान्य जनतेचे प्रश्न पोटतिडकीने मांडणारे आणि अन्यायाविरूद्ध रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे एक ज्येष्ठ आणि अभ्यासू व्यक्तीमत्व आपल्यातून निघून गेल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.

ज्येष्ठ नेते प्रा.डॉ.एन.डी. पाटील यांचे आज (सोमवारी) निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिक एन.डी. पाटील यांना आदारांजली वाहत आहेत. महाराष्ट्राचा आधारवड हरपला अशी भावना अनेकांनी व्यक्त केली असून डॉ. एन. डी. पाटील यांचे विचार पुढे नेण्यासाठी प्रयत्न करु या, असेही नमूद करीत आहेत.

Prithviraj chavan, N.D. Patil
एन. डी. पाटील....नेता नव्हे एक विचार!

आपल्या भावना व्यक्त करताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ''माजी मंत्री डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनाने सर्वसामान्य जनतेचे प्रश्न पोटतिडकीने मांडणारे नेतृत्व होते. अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे एक ज्येष्ठ आणि अभ्यासू नेते आज आपल्यातून निघून गेले. त्यांना आम्ही विनम्र श्रद्धांजली अपर्ण करतो.''

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com