Maratha Reservation: मराठा समाजाकडून लोकसभेसाठी चार उमेदवारांची घोषणा; जरांगेंच्या आवाहनानंतर प्रत्येक गावातून...

Madha Lok Sabha Constituency 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्याविरुद्धही अर्ज भरण्यात येणार आहेत. बीडमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलेल्या आवाहनानुसार माढा लोकसभेसाठी पंढरपूर तालुक्यातील पळशी गावातील चार उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.‌ मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. ही मागणी मान्य करण्यासाठी जरांगे यांनी आता निवडणुकीच्या माध्यमातून सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यातूनच त्यांनी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे मराठा समाज बांधवांना आवाहन केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Manoj Jarange Patil
Police Recruitment: पोलिस भरती प्रक्रियेला सुरुवात; फॉर्म कसा भरायचा, सविस्तर जाणून घ्या!

पळशी येथील मराठा समाज बांधवांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार धनंजय कलागते, संतोष झांबरे, विठ्ठल काटवटे आणि सचिन पवार यांची माढ्यातून उमेदवारी जाहीर केली आहे. लोकसभेसाठी प्रत्येक गावातून 2 अर्ज, 5000 उमेदवार देणार आहेत. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्याविरुद्धही अर्ज भरण्यात येणार आहेत. नुकतीच बीडमध्ये मराठा समाजाची बैठक झाली. बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत प्रत्येक गावातून दोन उमेदवार अर्ज भरणार आहेत, तर दुसरीकडे फक्त मराठा समाजातील उमेदवार नसेल तर इतर समाजातीलदेखील लोकांना या निवडणुकीत सरकारच्या विरोधात उभे करण्याची रणनीती मराठा सकल समाजाने आखली आहे. मराठा आरक्षण प्रश्नावर बीड तालुक्यातील धीरज मस्के या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या कुटुंबाला मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली. या वेळी नारायण गडचे महंत शिवाजी महाराज उपस्थित होते. मनोज जरांगे पाटील हे आज बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत.

मराठा समाजाच्या आंदोलनावर आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर द्वेष भावनेतून विशेष चौकशी समिती अर्थात एसआयटी नेमण्यात आली आहे. ही चौकशी समिती रद्द करावी, अशी मागणी नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील सकल मराठा समाजाने केली आहे. राज्यामध्ये मराठा समाजाच्या ओबीसी अंतर्गत आरक्षण मागणी हा लढा गेली 40 वर्षांपासून सुरू आहे. पुन्हा त्याच धर्तीवर मागील सात महिन्यांपासून राज्यात आंदोलन सुरू आहे.

मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलनाची हाक दिल्यानंतर हिंगोलीत मराठा आंदोलकांनी राज्य सरकारच्या योजनांची माहिती देण्यासाठी दाखल झालेल्या वाहनांवर हल्ला करत पोस्टर फाडले. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील वरुड गावात हा प्रकार घडला आहे. या वेळी आंदोलकांनी 'एक मराठा लाख मराठा' अशा आशयाच्या घोषणा दिल्या. मराठा आरक्षणाचा प्रश्न तत्काळ मार्गी लावा, अन्यथा परिणाम भोगायला तयार राहा, असा गर्भित इशारादेखील आंदोलकांनी दिला.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com