Madha Lok Sabha 2024: गोरेंसोबत निंबाळकरांच्या नेते अन् कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुरू

MP Ranjitsinh Naik Nimbalkar News:आमदार जयकुमार गोरेंसह या दौऱ्याची सुरुवात आमदार राम सातपुते यांच्या मांडवे येथील 'श्रीराम' या निवासस्थानी चहा व नाश्ता करून झाली
MP Ranjitsinh Naik Nimbalkar News
MP Ranjitsinh Naik Nimbalkar NewsSarkarnama

Madha loksabha News: खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आपल्या माढ्याच्या प्रचारास (Madha Lok Sabha 2024) आमदार जयकुमार गोरे यांच्या सोबतीने सुरुवात केली आहे. त्यांना कार्यकर्त्यांचा तसेच मतदारांचा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

भाजपने पुन्हा एकदा संधी दिल्याने उत्साहित झालेल्या खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात नेतेमंडळी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीने केली. आमदार जयकुमार गोरेंसह या दौऱ्याची सुरुवात माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्या मांडवे येथील 'श्रीराम' या निवासस्थानी चहा व नाश्ता करून झाली.

या वेळी ताकदीने काम करून नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याची ग्वाही दिली. त्यानंतर माळशिरसमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर भाजपच्या किसान मोर्चाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माळीनगर शुगर्सचे अध्यक्ष राजेंद्र गिरमे यांच्या निवासस्थानी कारखान्याचे संचालक व गिरमे समर्थकांशी चर्चा केली. या वेळी राजेंद्र गिरमे यांनी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांचा यथोचित सत्कार केला. खासदारांनी मागील पाच वर्षांत केलेल्या कामाचा विशेषतः पाणीप्रश्न मार्गी लावल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

MP Ranjitsinh Naik Nimbalkar News
Rahul Gandhi : भारत जोडो यात्रा भारतीय राजकारणात मैलाचा दगड ठरणार !

माढा लोकसभा निवडणुकीचे मुख्य केंद्र असलेल्या निमगाव (टेंभुर्णी) येथील आमदार बबनराव शिंदे, आमदार संजयमामा शिंदे व सोलापूर दूध संघाचे अध्यक्ष रणजित शिंदे यांच्या निवासस्थानी खासदार निंबाळकर व आमदार गोरे यांनी भेट दिली. या वेळी माढा व करमाळा मतदारसंघांसाठी खासदार निंबाळकर यांनी दिलेल्या योगदानातून उतराई होण्यासाठी खासदारांना निवडून आणण्याची संपूर्ण जबाबदारी शिंदे कुटुंबीयांनी घेतली. त्यानंतर माजी आमदार धनाजी साठे, राजाभाऊ चवरे, सांगोल्यात दीपक साळुंखे, आमदार शहाजी पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन पुढील रणनीतीबद्दल चर्चा केली.

या दौऱ्यात खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. या वेळी सोलापूरचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे, शशिकांत चव्हाण, लतिफ तांबोळी, माळशिरसचे नगराध्यक्ष अप्पासाहेब देशमुख, सुदर्शन यादव, प्रकाश घोडके, सोपानराव नारनवर, संजय देशमुख, शिवराज पोकळे, हणमंत कर्चे, भैया धाईंजे व त्याचे सर्व सहकारी, भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Edited by: Mangesh Mahale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com