अकोले ( जि. अहमदनगर ) - अकोले नगरपंचायतची निवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या नेतृत्त्वाखाली स्पष्ट बहुमत मिळविले. अकोले नगरपंचायतीत आज अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक झाली. यात मधुकरराव पिचड ( Madhukarrao Pichad ) यांच्या मानसकन्येला अकोले नगरपंचायतचे अध्यक्षपद देण्यात आले. ( Madhukarrao Pichad's Manasakanya to the post of Mayor of Akola: Balasaheb Wadje Vice President )
अकोले नगरपंचायतीत आज नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक झाली. यात अकोले नगरपंचायत नगराध्यक्षपदी भाजपच्या सोनाली नाईकवाडी तर शिवसेना राष्ट्रवादी आघाडीचे नवनाथ शेटे यांनी अर्ज दाखल केले होते. भाजपला बहुमत असल्याने सोनाली नाईकवाडी यांना नगराध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली. सोनाली नाईकवाडी यांच्या उमेदवारी अर्जाला सुचक बाळासाहेब वडजे तर अनुमोदक हितेश कुंभार होते. नाईकवाडी यांच्या अर्जाला सुचक असलेल्या बाळासाहेब वडजे यांना उपनगराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली.
नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपद जाहीर झाल्यावर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करत गुलालाची उधळण केली. भाजप कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजीही झाली. यावेळी माजी आमदार वैभव पिचड, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितिन दिनकर, भारतीय युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्रीराज डेरे आदी उपस्थित होते.
अकोले नगरपंचायतमध्ये भारतीय जनता पक्षाचे 12, राष्ट्रवादी काँग्रेस 2, शिवसेना 2 व राष्ट्रीय काँग्रेसचे 1 असे नगरसेवकांचे संख्याबळ आहे. सर्वाधिक 12 नगरसेवक भाजपाचे असल्याने नगराध्यक्षपदी सोनाली नाईकवाडी यांची निवड निश्चित समजली जात होती.
महाविकास आघाडीला चूक नडली
महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने एकत्रित निवडणूक लढविली असली तरी काँग्रेसने मात्र स्वतंत्र निवडणूक लढविली. शिवाय निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट दिसून आले. त्यामुळे मतांची विभागणी झाली. महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असताना भाजपने मात्र आपली सत्ता राखली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.