Mahadeo Jankar News : भाजपला इशारा देत महादेव जानकरांनी ठोकला 'या' जागांवर दावा

BJP Politics : भाजपने यापूर्वीही मित्र पक्षांना धोकाच दिला
Mahadev Jankar
Mahadev JankarSarkarnama

Mahadev Jankar on BJP : कर्नाटक निवडणुकीनंतर आता लोकसभेच्या निवडणुकीकडे राज्यातील सर्व पक्षांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीसह भाजप व मित्र पक्षांत जागावाटपावरून सतत चर्चा होताना दिसत आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये समसमान म्हणेज प्रत्येकी १६ जागांचा फॉर्म्युल्याची चर्चा आहे. तर भाजप, शिवसेना (शिंदे गट) व इतर मित्र पक्षांत दररोज नवीन चर्चा होताना दिसत आहे. दरम्यान, जागावाटपावरून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजपला 'तुमच्यासह नाहीतर तुमच्याशिवाय' असा थेट इशाराच दिला आहे.

जानकर पंढरपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपचा (BJP) चांगलाच समाचार घेतला आहे. जानकर म्हणाले, "भाजपने मित्रपक्षांना यापूर्वी धोकाच दिलेला आहे. आता त्यांचे डोळे उघडतील, अशी आशा आहे. लोकसभेला ते रासपला सन्मानपूर्वक जागा देतील. आमच्या मागणीनुसार जागा दिल्या तर त्यांच्यासोबत राहू, अन्यथा त्यांच्याशिवाय निवडणूक लढविणार आहे. सध्या भाजप जगातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला आहे. त्यामुळे तो आता मित्र पक्षांना विसरला आहे. भाजप आणि काँग्रेसची (Congress) एकच निती आहे."

यावेळी जानकर यांनी लोकसभेच्या सर्व जागा लढविण्याची तयारी केली असल्याची माहिती दिली. महादेव जानकर (Mahadev Jankar) म्हणाले, "आम्ही आता भाजपसोबत 'एनडीए' मध्ये आहोत. लोकसभेच्या निवडणुकीत भाजप रासपला (RSP) सन्मानपूर्वक जागा देतील, अशी अपेक्षा आहे. अन्यथा आम्ही राज्यातील सर्व ४८ जागा लढविणार आहोत. तसेच रासपने देशातील सर्व जागा लढविण्याची तयारी केली आहे. मला राज्यातून ५५ हजार रुपयांच्या एकूण एक हजार थैली मिळणार आहेत. लोक पैसे देतात मग मतेही देतील."

जानकर यांनी राज्यातील चार जागांवर दावा ठोकला आहे. जानकर म्हणाले, "राज्यातील माढा, बारामती (Baramati), परभणी, सांगली आणि उत्तर प्रदेशातील मिर्जापूर या जागांवर रासप निवडणूक लढविणार आहे. या जागा दिल्या नाही तर आम्ही स्वबळावर सर्व निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. देशातील सर्व जागांवर रासप उमेदवार देणार आहेत. कर्नाटकमध्येही (Karnataka) उमेदवार उभे केले होते."

यावेळी जानकर यांनी महाविकास आघाडीवरही टिपण्णी केली. ते म्हणाले, महाविकास आघाडीतील (MVA) घटक पक्ष भाजपला दूर ठेवण्यासाठी एकत्र येण्याचा प्रयत्न करतील. मात्र प्रत्येक पक्ष १६-१६ जागा मागत असेल तर त्यांच्यातील जागावाटप सुरळीत पार पडले, असे वाटत नाही."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com