कोल्हापूर : भविष्यात कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात महाडिक, कोरे आणि आवाडे निश्चितपणे बदल घडवतील, असा विश्वास माजी आमदार महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik) यांनी आज व्यक्त केला. पुलाची शिरोली येथील जनसंपर्क कार्यालयात झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. त्यानंतर माजी आमदार अमल महाडिक (Amal Mahadik) यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेसाठी (District Bank Election) माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी पांढऱ्या गांधी टोप्या घालून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. संस्था गटातील 140 पैकी 115 मतदार आपल्यासोबत असल्याचा दावाही महाडिक यांनी केला.
जिल्हा बॅंकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शक्ती प्रदर्शन केले जात आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक यांना पाठिंबा दिलेल्या मतदारांनीही आज शक्तीप्रदर्शन करत महाडिक यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. महाडिक यांचा जयघोष करत उपस्थित सर्व मतदार व कार्यकर्ते जिल्हा बॅंकेच्या मुख्य कार्यालयासमोर एकत्र आले.
तत्पूवी शिरोलीमध्ये झालेल्या मेळाव्यात माजी आमदार महादेवराव महाडिक म्हणाले, जिल्हा बॅंकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सर्वच नेत्यांना यामध्ये पुढाकार घेतला आहे. काही जागांसाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे. चार-पाच दिवसात सर्वच चित्र स्पष्ट होणार आहे. पण, भविष्यात आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे आणि आपण स्वत: कोल्हापूरचे राजकारण बदलल्याशिवाय राहणार नाही, अशा विश्वासही महाडिक यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.