Solapur Politics : ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना मोठा धक्का! उपनगराध्यक्षासह 15 नगरसेवकांची पक्षाला सोडचिठ्ठी

Niranjan Bhumkar joined NCP SP: सोलापूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. कारण अजित पवार गटाचे बार्शी तालुक्यातील नेते निरंजन भूमकर यांनी घड्याळाची साथ सोडत तुतारी हाती घेतली आहे.
Ajit Pawar-NCP-Sharad Pawar
Ajit Pawar-NCP-Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Solapur News, 31 Oct : विधानसभा निवडणूक (Assembly Election) अवघ्या 20 दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे या निवडणुकीत आपल्या पक्षाचे उमेदवार निवडून यावेत यासाठी नेत्यांनी राजकीय डाव टाकायला सुरूवात केली आहे.

शिवाय आपल्या पक्षाची ताकद वाढावी यासाठी विविध राजकीय पक्षात मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश केले जात आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) मित्र पक्ष विरोधी पक्षातील नाराज नेते आणि पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घेण्यास प्राधान्य देत आहेत.

अशातच आता सोलापूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. कारण अजित पवार गटाचे बार्शी तालुक्यातील नेते निरंजन भूमकर यांनी घड्याळाची साथ सोडत तुतारी हाती घेतली आहे.

Ajit Pawar-NCP-Sharad Pawar
Purandar Assembly Election: विधानसभेसाठी अजितदादांनी लोकसभेचा तह मोडला? महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार

भूमकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत गोविंद बाग येथे पक्षप्रवेश केल्याची माहिती आहे. निरंजन भूमकर यांच्यासह 15 नगरसेवकांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

Ajit Pawar-NCP-Sharad Pawar
Sameer Meghe : फडणवीस, पटोले, वडेट्टीवार, बावनकुळेंना मागे टाकून भाजपचे 'हे' उमेदवार ठरले नंबर वन; संपत्तीत 102 कोटींनी वाढ

भूमकर हे वैराग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष आणि तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य असून त्यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यामुळे हा अजित पवारांना मोठा धक्का मानला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com