Maharashtra-Karnataka Border Dispute: बेळगावला कधी जाणार? शंभूराज देसाईंनी दिले उत्तर

शंभुराजे देसाई आज महाराष्ट्र- कर्नाटक सीमाभागातील शिनोळी गावाचा दौरा करणार आहेत.
Shambhuraj Desai-
Shambhuraj Desai-
Published on
Updated on

Shambhuraje Desai : सीमा भागातील बांधवांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी समन्वयक मंत्री म्हणून चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) आणि मी बेळगावला जाणार आहोत, मात्र त्यासाठी अगोदर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहोत अधिवेशन झाल्यानंतर आम्ही बेळगावला जाऊ, असं वक्तव्य राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी सरकारनामाशी बोलताना केलं.

शंभुराजे देसाई आज महाराष्ट्र- कर्नाटक सीमाभागातील शिनोळी गावाचा दौरा करणार आहेत. कोल्हापुर मार्गे गडहिंग्लज आणि तिथून शिनोळी असा देसाई यांचा प्रवास असेल. ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने देसाई याठिकाणी सभा घेणार आहेत. शिनोळी हे गाव महाराष्ट्रात अगदी कर्नाटक सीमेजवळ आहे. कर्नाटक महाराष्ट्र सीमावादाचा मुद्दा अद्यापही ताजा असताना देसाई यांच्या दौऱ्याला विशेष महत्व आहे.

Shambhuraj Desai-
Beed Election : आमदार सोळंकेंनी सत्तेतून चौकशा लावल्या; जोर लावला तरी आडसकरांनीच निवडणूक जिंकली

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर काही सूत्र आणि धोरण ठरले आहेत, या धोरणाप्रमाणे आम्ही पुढे जाऊ, या धोरणांना तडा जाईल,असं कोणतंही कृत्य केले जाणार नाही. आज मी जरी सीमा भागातून जात असलो तरी हा दौरा महाराष्ट्रातील चंदगड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आहे. रोहित पवार कशासाठी बेळगावला गेले होते माहिती नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या ठिकाणी असेल तेथे कोणीही केलं की अभिवादन करतात. त्याप्रमाणे रोहित पवारही बेळगाव मधील पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी गेले असतील. सीमा भागातील बांधवांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री असताना बंद झाल्या होत्या त्या पुन्हा सुरू करून या योजनांमध्ये आणखी वाढ करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत त्यावर काम सुरू आहे लवकरच याही योजना सुरू होतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com