Opposition Leader: राष्ट्रवादीतील फुटीनंतर विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसच्या 'या' नेत्याच्या नावाची चर्चा; पक्षश्रेष्ठींना पत्र..

Maharashtra Politics: राज्याला खऱ्या सक्षम विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षनेत्याची गरज आहे.
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratSarkarnama
Published on
Updated on

-राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर राज्यात नवे राजकीय समीकरणं तयार होत आहेत. बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे येईल, यावर चर्चा सुरु आहे. या पदावर काँग्रेसने केलेला दावा योग्य असून माजी मंत्री बाळासाहेब थोरातांच्या खांद्यावर पक्षाने विरोधी पक्षनेते पदाची धुरा सोपवावी, अशी मागणी शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने पक्षाचे नेते राहुल गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे पत्र पाठवून करणार असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी म्हटलं आहे.

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचा जन्म झाला होता. मात्र राष्ट्रवादीचे अनेक आमदार भाजप सोबत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस पुढे आला आहे.

Balasaheb Thorat
Pankaja Munde : पंकजा मुंडे समेट करणार की नवा संघर्ष उभारणार ; भाजप -राष्ट्रवादी एकत्र लढणार..

बाळासाहेब थोरात हे काँग्रेस पक्षाशी सदैव एकनिष्ठ आहेत. पक्षाच्या पडत्या काळात आणि आव्हानात्मक परिस्थितीमध्ये त्यांनी बाजीप्रभूंची भूमिका सक्षमपणे वठवलेली आहे. त्यामुळेच काँग्रेस संपली अशी आवई राज्यात उठवली जात असताना काँग्रेसला त्यांनी सत्तेत आणण्याचा करिष्मा करून दाखवलेला आहे. त्यांच्या पक्ष एकनिष्ठतेचा इतिहास अनेक दक्षकांचा, पिढ्यांचा आहे. अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये पक्षाने त्यांच्यावर राज्याच्या विरोधी पक्षनेते पदाची धुरा सोपवावी अशी कार्यकर्त्यांची भावना असून राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गेंना तसे पत्र पाठविणार असल्याचे किरण काळे यांनी म्हटले आहे.

"यापूर्वीच्या अहमदनगर जिल्ह्यातील राज्याच्या माजी विरोधी पक्षनेत्यांनी भाजपची वाट धरली. आताच्या विद्यमान विरोधी पक्षनेत्यांनी देखील भाजपची वाट धरत थेट सत्तेत जाऊन बसले आहेत. राज्याला खऱ्या सक्षम विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षनेत्याची गरज आहे. कुणी कुणा सोबत जावे, हा ज्या त्या पक्षाचा नेत्यांचा, आमदारांचा प्रश्न आहे. मात्र यामुळे सर्वसामान्य मतदारांचा राजकीय व्यवस्थेवरील विश्वास ढासळत चालला आहे, असे असले तरी देशाला अधोगतीच्या मार्गावर नेत जातीय द्वेष पसरविणाऱ्या भाजप समवेत काँग्रेस कदापी ही जाणार नाही, असा काँग्रेस कार्यकर्त्यांसह जनतेला देखील पूर्ण विश्वास आहे," असे काळे म्हणाले

Balasaheb Thorat
Amol Kolhe Resignation Update: खासदार अमोल कोल्हेंचा राजीनामा खिशातच; पवारांसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

विखेंनी याबाबत न बोललेलेच बरे...

भाजप खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी 'अब काँग्रेस की बारी है,' असे म्हणत काँग्रेस फोडण्याबाबत वक्तव्य केले होते. याला किरण काळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. विखेंनी याबाबत न बोललेलेच बरे. तुम्ही ज्या काँग्रेसच्या जीवावर मोठे झालात त्याच काँग्रेसमधून फुटून भाजपच्या दावणीला गेलात. काँग्रेस फोडण्याची स्वप्न पाहण्यापूर्वी आधी गणेश कारखान्याच्या निवडणुकीत तुमच्याच उत्तरेतील पारंपारिक मतदारांनी तुमचा भ्रमाचा भोपळा फोडला आहे. त्याकडे आधी लक्ष द्यावे. मग काँग्रेस फोडण्याची भाषा करावी. काँग्रेसची चिंता करू नये, असा सल्ला काळेंनी विखे यांना दिला आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com