स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) सध्या राज्याचा दौऱ्यावर आहेत. सामाजिक चळवळीची पार्श्वभूमी असलेले छोटे छोटे पक्ष, स्थानिक सामाजिक संस्था यांना एकत्र करुन त्यांची मोट बांधून तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी चाचपणी करीत आहे.
महाराष्ट्रात सध्या राजकारणाची (Maharashtra Politics)पातळी घसरली आहे.आम्हाला राजकीय व्यवस्थेत बदल घडवायचा आहे. ते घडविण्याचा मार्ग म्हणून आम्ही निवडणुकीकडे बघतो. संपूर्ण परिवर्तन करु एवढी सध्यातरी आमची ताकद नाही. पण व्यवस्थेवर अंकुश ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे शेट्टी साम टीव्हीशी बोलताना म्हणाले.
"सामाजिक चळवळीची पार्श्वभूमी असलेले छोटे छोटे पक्ष, स्थानिक सामाजिक संस्था या सगळ्यांना एकत्र करुन मतदारसंघ निहाय चांगला चेहरा त्या त्या मतदारसंघात द्यायचा आमचा प्रयत्न असेल. स्वच्छ चेहरा, मतदारसंघाला दिशा देण्याचे व्हिजन असेल असे उमेदवार शोधून त्यांच्यापाठीमागे आपल्या चळवळीची पुण्याई लावाणार आहे. मोजकेच लोकप्रतिनिधी निवडून आणायचे, जेणेकरुन भविष्यात कुणाचीही सत्ता आली तरी त्यांच्यावर अंकुश ठेवून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सातत्याने विधानसभेत मांडले पाहिजे.त्यासाठी आमचा प्रयत्न सुरु आहे," असे शेट्टी यांनी सांगितले.
स्वाभिमानी संघटना, शरद जोशी यांची शेतकरी संघटना, शेतकरी संघटनेशी संबधीत असलेले अनेक नेते, पदाधिकारी सध्या बीआरएसमध्ये आहेत. या सगळ्यांना घेऊन काही आश्वासक चेहरे घेऊन जनतेला एक सक्षम पर्याय देण्याता आम्ही प्रयत्न करीत आहोत, आम्हाला सत्तेची हाव नाही, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले.
शेट्टी म्हणाले,"निवडून आल्यावर सत्ताधारी आघाडी सहभागी होणार का? यावर ते म्हणाले, "सध्या आम्ही सगळ्या पक्षापासून अंतर ठेवून आहोत. छोट्या छोट्या पक्षांना घेऊन एकत्र येणार आहोत. मोठ्या सगळ्या पक्षांना महत्त्वाकांक्षा आहे. त्यामुळे एकहाती सत्ता येणार नाही. त्यांचाकडे पैसा खूप आहे. महाविकास आघाडी आणि महायुती शेवटपर्यंत एकसंघ राहिल असे मला वाटत नाही, अजून खूप काही घडामोडी घडणार आहेत,"
"सत्तेचा मोह आम्हाला कधीच नव्हता. अनेकवेळा आम्ही लाभाच्या पदापासून अलिप्त राहिलो आहे. लाभाच्या पदाला लाथ मारली आहे. आम्हाला राजकीय व्यवस्थेत बदल घडवायचा आहे. ते घडविण्याचा मार्ग म्हणून आम्ही निवडणुकीकडे बघतो. संपूर्ण परिवर्तन करु एवढी सध्या तरी आमची ताकद नाही. या व्यवस्थेवर अंकुश ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत," असे शेट्टी म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.