Maan News : 'महाविकास'ने राजकिय आकसातून जिहे कटापूरचे टेंडर रखडवले : जयकुमार गोरे

Pune पुणे येथील सिंचन भवनात आमदार गोरे आणि जलसंपदा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या योजनेची कामे सुरु करण्याबाबत आढावा घेण्यात आला.
MLA Jaykumar Gore
MLA Jaykumar Goresarkarnama

Jaykumar Gore News : महाविकास आघाडी Mahavikas Aghadi सरकारच्या काळात अडीच वर्षे जिहे कटापूर सिंचन योजनेच्या कामांची निविदा रखडवली. केंद्राच्या प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेत समावेश करुन निधी वितरित केला, तरीही राजकीय आकसातून निविदा प्रक्रिया थांबवली होती. आता आमचे सरकार येताच वेगाने निविदा प्रक्रिया पूर्ण होवून या योजनेची कामे सुरु होत आहेत. माण तालुक्याच्या उत्तर भागातील सुमारे ३२ गावांना या योजनेचे पाणी देण्याचे नियोजन पूर्ण झाल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे Jaykumar gore यांनी दिली.

जिहे कटापूर सिंचन योजनेचे पाणी आंधळी धरणातून उचलून वंचित गावांना देण्यासाठी आपण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव मांडून या कामांची मंजूरी घेतली होती.आज झालेल्या बैठकीत या योजनेची कामे सुरू करण्याबाबत आढावा घेण्यात आला असून तालुक्याच्या उत्तर भागातील सुमारे ३२ गावांना जिहेकठापूर योजनेचे पाणी देण्याचे नियोजन पूर्ण करण्यात आल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष आ.जयकुमार गोरे यांनी दिली.

पुणे येथील सिंचन भवनात आमदार गोरे आणि जलसंपदा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत या योजनेची कामे सुरु करण्याबाबत आढावा घेण्यात आला.बैठकीला जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता डॉ.धुमाळ,साताऱ्याचे अधिक्षक अभियंता ज.स.शिंदे,सहाय्यक मुख्य अभियंता म.वि.म्याकल, कार्यकारी अभियंता निकम, सहाय्यक अभियंता सुतार आणि करांडे उपस्थित होते.

MLA Jaykumar Gore
Maan News: वर्षभरात 'महाविकास'चीच सत्ता राज्यात येणार...रवींद्र धंगेकर

जयकुमार गोरे म्हणाले,जिहे कठापूर योजनेच्या मूळ आराखड्यात या योजनेद्वारे येणारे पाणी येरळा आणि माणगंगा नदीत सोडण्याचे प्रस्तावित आहे.नद्यांमधील पाणी बंधाऱ्यांमध्ये अडवून ते शेतकऱ्यांना उचलून शेतापर्यंत न्यावे लागणार होते. २०१९ साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी सविस्तर प्रस्ताव मांडला होता.

या योजनेचे पाणी पाईपलाईनद्वारे शेतकऱ्यांना देण्याचा आराखडा तयार करण्याच्या सुचना तेव्हा देण्यात आल्या होत्या.माण तालुक्याच्या उत्तर भागातील सुमारे ३२ गावांना जिहेकठापूर योजनेचे आंधळी धरणात येणारे पाणी उचलून देण्याची वाढीव योजना फडणवीस यांच्याकडे सादर केली होती. राज्याच्या इतिहासात विक्रमी कमी कालावधीत या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.

MLA Jaykumar Gore
Satara News : उदयनराजेंच्या जावळी दौऱ्यावरुन शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, १५ वर्षानंतर त्यांचे दौरे सुरू झालेत....

महाविकास आघाडी सरकारच्या काळात अडिच वर्षे या योजनेच्या कामांची निविदा रखडविण्यात आली होती.निधी मंजूर होता,केंद्राच्या प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेत समावेश करुन निधी वितरित केला होता,तरीही राजकीय आकसातून निविदा प्रक्रीया थांबवण्यात आली होती.आता आमचे सरकार येताच वेगाने निविदा प्रक्रिया पूर्ण होवून या योजनेची कामे सुरु होत आहेत.

सिंचन भवनात आयोजित बैठकीत या योजनेच्या कामात येणाऱ्या भूसंपादन आणि इतर अडचणींवर चर्चा करुन तोडगा काढण्याचे प्रयत्न करण्यात आले.उत्तर माणच्या ३२ गावांना जिहेकठापूरचे पाणी लवकरात लवकर देण्यासाठी कामे वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे आ.गोरे यांनी सांगितले.

MLA Jaykumar Gore
Mumbai High Court On BMC : न्यायालयाच्या निर्णयाने ठाकरेंना मोठा धक्का; मुंबई महापालिकेतील गणित बदलणार...

फडणवीस यांच्या हस्ते भूमीपूजन...

पुण्यातील सिंचन भवनात आमदार जयकुमार गोरे आणि कृष्णा खोरे सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांमधील बैठक तीन तास चालली. बैठकीत जिहेकठापूर वाढीव योजनेच्या रायजिंग मेन,पंप हाऊस, विद्युत विभागासह प्रत्येक कामाचा बारकाईने आढावा घेण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या कामाचे भूमिपूजन करण्यासाठी येणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com