२०२४ च्या निवडणुकीतही महाविकास आघाडीच असणार; सहकारमंत्र्यांचे भाकित

विरोधी पक्षाने Opposition Party आत्तापर्यंत आमचे महाविकास आघाडीचे Mahavikasaghadi सरकार पडण्यासाठीच्या अनेकदा तारखा दिल्या. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार भक्कम आहे.
Balasaheb Patil
Balasaheb Patilsarkarnama
Published on
Updated on

कऱ्हाड : ''विरोधी पक्षांकडुन सरकार पाडण्यासाठीच्या सातत्याने तारखा देण्यात येत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिलेली १० मार्च तारीख होऊन नऊ दिवस झालेत. मात्र, महाविकास आघाडी सरकार भक्कम आहे, असे लक्षात आल्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही २०२४ पर्यंत थांबतो आहोत, असे सांगितले आहे. मात्र, आम्ही २०२४ च्या निवडणुकीलाही महाविकास आघाडी म्हणुन दमदारपणे सामोरे जाऊ,'' असा विश्वास सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर विरोधी भाजपच्या नेत्यांकडुन सातत्याने सरकार पडण्यासंदर्भात विधाने केली जात आहेत. त्यासंदर्भात विचारले असताना बोलताना बाळासाहेब पाटील म्हणाले, ''जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे. मात्र, आम्हाला सत्ता मिळु शकली नाही, याचे शल्य असल्याचे विरोधकांच्या देहबोलीतुन दिसुन येत आहे. निव्वळ सत्तेच्या मागे लागल्यामुळे काही आरोप होताना दिसत आहेत.''

Balasaheb Patil
जयंतरावांनंतर आता राष्ट्रवादीचे मंत्री बाळासाहेब पाटील हे राजू शेट्टींचे टार्गेट

विरोधी पक्षाने आत्तापर्यंत आमचे महाविकास आघाडीचे सरकार पडण्यासाठीच्या अनेकदा तारखा दिल्या. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार भक्कम आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना नुकतीच दिलेली १० मार्च तारीख होवुन नऊ दिवस झाले. मात्र, महाविकास आघाडी सरकार आजही भक्कम आहे. हे लक्षात आल्यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही २०२४ पर्यंत थांबतो आहोत, असे सांगीतले आहे. मात्र आम्ही २०२४ च्या निवडणुकीलाही महाविकास आघाडी म्हणुन दमदारपणे सामोरे जावु, असा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com