Makai Sugar Factory : बागलांकडून विरोधकांचा 'करेक्ट कार्यक्रम' : मकाई कारखाना बिनविरोध होण्याच्या मार्गावर?

Makai Sugar Factory Election Karmala : बागल यांची ही खेळी यशस्वी झाली तर मकाई सहकारी साखर कारखाना बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
Makai Sugar Factory Election
Makai Sugar Factory ElectionSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : करमाळा तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याची निवडणूक निर्णायक वळणावर आली आहे. बागल कुटुंबीयातील रश्मी बागल आणि दिग्विजय बागल यांनी ज्या मुद्यावर मकाई कारखान्यासाठी अर्ज भरला नाही, त्याच थकबाकीच्या कारणावरून बागलांनी विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा रंगली आहे. बागल यांची ही खेळी यशस्वी झाली तर मकाई सहकारी साखर कारखाना बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

स्थापनेपासून मकाई सहकारी साखर (Sugar Factory Election) कारखान्यावर बागल गटाची एकहाती सत्ता आहे. कारखाना सध्या मोठ्या आर्थिक अडचणीत असल्याने कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणात कोण उतरेल की नाही, अशी परिस्थिती असतानाच शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झाली.

Makai Sugar Factory Election
Sharad Pawar News : 'मी बाबा आढावांना ५०-६० वर्षे ओळखतो'; ...तर ते त्यांना योग्य धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत : पवारांनी स्पष्टच सांगितले

कारखान्याच्या 17 जागेसाठी एकूण 75 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, विरोधी गटाच्या प्रमुख उमेदवार सविताराजे भोसले, रामदास झोळ यांच्यासह 36 उमेदवारांवर सत्ताधारी बागल गटांकडून आक्षेप घेण्यात आला आहे. बागल गटांनी घेतलेले आक्षेप ग्राह्य धरल्यास मकाई सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. जर हे उमेदवारी अर्ज ग्राह्य धरले तर मात्र ही निवडणूक लक्षवेधी होण्याची शक्यता आहे.

आक्षेपांवर शुक्रवार (ता 19) रोजी निवडणूक निर्णय अधिकारी सोपान टोंपे यांच्याकडे सुनावणी झाली आहे. त्यामुळे मकाई कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बागल विरोधात ज्यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत त्यांच्याकडे आदिनाथ कारखान्याचा शेअर्स अपूर्ण असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. हा आक्षेप ग्राह्य धरल्यास विरोधी गटाचे फॉर्म बाद होणार आहेत. बागल विरोधात ज्यांनी फॉर्म भरले आहेत त्यांचे फॉर्म बाद करण्यासाठी मोठी कायदेशीर ताकद वापरण्यात आली आहे. दुसरीकडे, उमेदवारी अर्ज ग्राह्य धरण्यासाठी विरोधी गटानेही वकिलांची मोठी फौज उभा केली आहे.

Makai Sugar Factory Election
Kishor Aware Murder Case Update : आवारे खून प्रकरणात नवा ट्विस्ट; माजी नगरसेवकाच्या मुलानंतर पित्याचाही खूनात आढळला सहभाग

याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी सोमवार (ता. 22) रोजी काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल, दिग्विजय बागल या बहिण भावांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. या दोघांच्या नावे कर्ज असून ते थकीत असल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे याच मुद्द्याच्या आधारे विरोधात उमेदवारी अर्ज भरलेल्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा त्यांचा मनसुबा असल्याची चर्चा आहे.

दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रा. रामदास झोळ यांनी मकाई बचाव समितीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न केला, तर शेवटच्या दिवशी मोहिते पाटील समर्थक सविताराजे भोसले यांनी पॅनल उभा करत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मात्र विरोधकांचे ज्यांनी उमेदवारी अर्ज मंजूर होणार नाहीत, याची काळजी बागल गटाकडून घेण्यात आल्याचे दिसून येते. उमेदवारी अर्जाची छाननी सुरू होताच बागल गटाकडून विरोधातील उमेदवारी अर्ज भरलेले, त्यांचे अनुमोदक, सूचक यांच्याकडे श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याने वाढीव शेअरची रक्कम अपूर्ण असल्याचा आक्षेप घेतला आहे.

याशिवाय ज्या गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, त्याच गटातील अनुमोदक सूचक नाहीत. कारखान्याला सलग तीन वर्षे ऊस घातलेला नाही, असेही आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. यावर दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपापली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोन्हीही बाजू ऐकून घेतली असून निकाल राखून ठेवला आहे. तो निकाल सोमवार सकाळी 11 वाजता घोषित करण्यात येणार आहे.

Makai Sugar Factory Election
Mahavikas Aghadi News : आघाडी पुन्हा आवळणार 'वज्रमूठ'; सभेची तारीख अन् ठिकाणही ठरले : कर्नाटकने दिले बळ...

आदिनाथच्या मुद्द्यावर अर्ज बाद होणार नाहीत

एखाद्या कारखान्याने शेअरची रक्कम वाढवली असल्यास ती रक्कम तीन वर्षात भरणे गरजेचे असते. सभासदांनी ती रक्कम तीन वर्षांत भरली नाही, तर आणखी एक वर्षाची मुदतवाढ मिळते, त्यानंतर कारखाना प्रशासनाकडून संबंधित सभासदाला नोटीस दिली जाते. त्यानंतरही संबंधित सभासदाने वाढवलेली शेअर्स रक्कम भरली नाही, तर त्यावर कारवाई केली जाते. त्यामुळे आदिनाथ कारखान्याचा शेअर्स अपूर्ण असणे या मुद्द्यावर उमेदवारी अर्ज बाद करता येणार नाहीत. असे बागल विरोधी गटाचे वकील अॅड. प्रशांत मैंदर्गी यांनी सांगितले.

निवडणूक अधिकारी आमच्या बाजूने निर्णय देतील

बागल गटाकडून ज्या उमेदवारांवर हरकत घेण्यात आली आहे, त्यांच्याकडे सहकारी संस्थेचे येणे आहे. तसे दाखले आम्हाला आदिनाथ सहकारी साखर कारखान्याने दिलेले आहेत. या मुद्द्यावर आम्ही त्यांच्यावर हरकत घेतलेली आहे. मकाई सहकारी साखर कारखान्याच्या पोटनियमात ज्या गटातून उमेदवारी अर्ज भरला आहे, त्याच गटातील अनुमोदक आणि सूचक हवा आहे. आम्ही घेतलेल्या आक्षेपाचा निवडणूक निर्णय अधिकारी योग्य ते विचार करून आमच्या बाजूने निर्णय देतील अशी आम्हाला आशा आहे, असे बागल गटाचे वकील अॅड. नानासाहेब शिंदे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com